आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लिंबूसाठी फळपीक विमा कवच:वाडेगाव येथील शेतकऱ्यांचे‎ कृषिमंत्री सत्तार यांना निवेदन‎

पातूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथे‎ सोमवारी १० एप्रिलला अवकाळी पावसाने‎ झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी‎ महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार‎ यांनी पाहणी केली आहे. या वेळी‎ शेतकऱ्यांची लिंबू पीक, कांदा उत्पादक‎ शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकल्या. सोबतच‎ वाडेगाव येथील शेतकऱ्यांनी कृषिमंत्री‎ अब्दुल सत्तार यांच्याकडे निवेदन देऊन‎ परिसरात हवामान आधारित आंबिया बहार‎ योजनेमधून वगळण्यात आलेल्या लिंबू व‎ फळ पिकांचा पुन्हा समावेश करण्याची‎ मागणी केली. हवामान बदलाच्यानुसार‎मध्ये‎ आंबिया बहारचा समावेश असणे आवश्यक‎ आहे. शेतकऱ्यांना विपरीत हवामान‎ बदलामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात‎ नुकसान होत असल्याने शेतकरी हतबल‎ झाले आहे. तरी शेतकऱ्यांना फळपीक‎ विमामध्ये जर समावेश केला तर नक्कीच‎ शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे‎ शेतकऱ्यांनी निवेदनात म्हटले आहे.‎