आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पक्षाची मागणी:काळेगांव-हरसोडा शिवारातील शेतीच्या नुकसानीचा सर्व्हे व्हावा

मलकापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

निसर्गाच्या अवकृपेने विश्वगंगा नदी व नाल्याकाठच्या शेतीतील पिकांची हाणी झाली आहे. यात काळेगांव-हरसोडा शिवारातील शेतीचे झालेले नुकसानीचा तत्काळ सर्व्हे व्हावा व आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत तहसीलदार यांना २३ ऑगस्ट रोजी निवेदन देण्यात आले. या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, गत काळात तालुक्यात झालेल्या संततधार पावसामुळे विश्वगंगा नदी, नाल्याकाठी असलेल्या शेतातील खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान शेतात पाणी साचल्याने सोयाबीन, उडीद , मुग, ज्वारी, तूर, कापूस आदी पिकांना फटका बसला आहे. पाणी साचून पिके सडल्याने शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास हिरावला गेला आहे. त्यामुळे शेतातील पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तरी या नुकसानीचा तात्काळ सर्व्हे होवून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. या निवेदनावर राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष संतोषराव रायपूरे, तालुकाध्यक्ष बाळाभाऊ पाटील, शहराध्यक्ष अरुण अग्रवाल,अनिल झोपे, संजय जाधव, युवराज रायपूरे, रफिक खान, बाळू भिसे, चेतन जगताप, राजाभाऊ डोफे, चेतन मुकूंद, अनिल रायपूरे, महेश शिंदे, डॉ.सुभाष तलरेजा, सुधाकर पाचपोर, अमित झनके यांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...