आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहन पकडले:चोरीच्या जनावरांची वाहतूक करणारे संशयित वाहन पकडले

बुलडाणा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पेट्रोलिंग करत असताना चोरीच्या जनावरांची वाहतुक करणारे एक संशयित वाहन पकडले. यावेळी पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये जनावराचे शेण व दोऱ्या आढळून आल्या. वाहन चालक व त्याचे साथीदार हे चोरीच्या जनावरांची वाहतुक करत असल्याच्या शक्यतेने पोलिसांनी हे वाहन जप्त करून पुढील कारवाईसाठी चिखली पोलिसांच्या ताब्यात दिले. ही कारवाई शनिवार, १७ डिसेंबर रोजी पहाटे ३ वाजताच्या सुमारास करण्यात आली.

शुक्रवारी रात्रीच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करत असताना देऊळगावराजा कडून चिखलीकडे येत असलेली तवेरा गाडी पोलिसांना दिसून आली. परंतु या वाहनाचा मागील नंबर अस्पष्ट दिसत असल्याने पोलिसांनी राऊत वाडी समोर जावून वाहन थांबवण्याचा चालकास इशारा दिला. परंतु वाहन चालकाने आपले वाहन न थांबविता आपले वाहन बुलडाणा टोल नाक्यावरून पुन्हा चिखलीकडे वळविले. यावेळी पोलिसांनी वाहनाचा पाठलाग केला असता चालकाने आपले वाहन गवळी पुरा चिखली येथे सोडुन पसार झाला. जनावरांची वाहतुक करण्यासाठी या वाहनाचा वापर होत असल्याचे लक्षात आल्याने ते जप्त करून पुढील कारवाईसाठी चिखली पोलिसांच्या ताब्यात दिले. प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बळीराम गिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ ओम प्रकाश साळवे, दिगंबर कपाटे, दिपक वायाळ व मनोज खरडे यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...