आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरट्यांचा धुमाकूळ:वरवट बकाल येथे भुरट्या चोरट्यांचा धुमाकूळ; वाहनांमधील पेट्रोल चोरीचेही प्रमाण वाढले

संग्रामपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यात आतापर्यंत मोटरसायकल चोरी, मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील पैसे लंपास करणे यासह इतर लहान सहान चोरीच्या घटना घडत होत्या. परंतु आता चोरट्यांनी आपला मोर्चा दुचाकीतील पेट्रोल चोरीकडे वळवला आहे. हे भुरटे चाेर दुचाकी मधील पेट्रोल चोरी करून आपली गरज भागवत आहेत. त्यामुळे दररोज कुणाच्या ना कुणाच्या वाहनातुन पेट्रोल चोरी करण्यात येत आहे. त्यामुळे वाहन धारक कमालीचे त्रस्त झाले आहेत.

वरवट बकाल हे गाव तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण असून या गावात चारचाकी व दुचाकी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. परंतु मागील काही दिवसापासून चोरट्यांनी या वाहनांना आपले लक्ष केले आहे. विशेष म्हणजे गावातील साई नगरीतील काही भाडेकरूच्या दुचाकी मधील दर तिसऱ्या चौथ्या दिवशी पेट्रोलची चोरी करण्यात येत आहे. यावरही कळस म्हणजे दोन दिवसापुर्वी सरपंचासह माजी सरपंचांच्या वाहनातील पेट्रोल चोरी करण्यात आली आहे. मागील काही दिवसापासुन पेट्रोलचे भाव गगनाला भिडले असून प्रति लिटर १२० रुपया पर्यंत भाव गेले आहेत. त्यामुळे वरवट बकाल येथे भुरट्या चोरांची संख्या वाढली आहे.

आता पर्यंत मोटर सायकल चोरी, मंदिरातील दानपेटी फोडून चोरी आणि शेतातील साहित्याची चोरी, व इतर लहान सहान चोर्‍या होत होत्या. परंतु काहीजण आपली गरज पूर्ण करण्यासाठी दुचाकी मधील पेट्रोल चोरी करून त्याची विक्री करीत आहेत. याच पैशातून चोरटे आपला दारूची गरज पू्र्ण करीत आहेत. दुचाकी मालक रात्री गाढ झोपेत असताना त्यांच्या वाहनाची पेट्रोलची नळी कापून त्यातील पेट्रोल चोरी करीत आहेत. अशी माहिती एका स्थानिक पत्रकाराने दिली आहे. यासाठी ग्रामपंचायत प्रशासन व पोलिस प्रशासनाने ठोस उपाययोजना करून या भुरट्या चोरट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी गावातील नागरिक करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...