आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भावाविरुद्ध गुन्हा दाखल:आजारी वडिलास भेटण्यास आलेल्या तृतीयपंथी युवकास तिघांची मारहाण

देऊळगावराजा22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजारी वडिलांना भेटण्यासाठी आलेल्या तृतीयपंथी युवकास वडिलांसह सावत्र आई व सावत्र भावाने मारहाण करून अश्लील शिविगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच दगड मारून कारच्या समोरील काचा फोडून नुकसान केले. एवढेच नव्हे तर तृतीयपंथी असल्याबद्दल घाणेरड्या भाषेत बोलून अपमानित केल्याची घटना तालुक्यातील जुमडा येथे ११ सप्टेबर रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली.

पोलिसांनी वडिलांसह सावत्र आई, भावावर गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निकिता नारायण मुख्यादल हा युवक तृतीयपंथी असून पिंपरी चिंचवड तालुक्यातील वाल्हेकर वाडी चौकात राहताे. तो पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहे. तो आपला सख्खा भाऊ संतोष नारायण मुख्यादल रा. सावखेड तेजन याच्यासोबत वडील आजारी असल्याने त्यांना भेटण्यासाठी आपल्या गावी जुमडा येथे आला होता. त्यावेळी सावत्र आई विमलबाई व भाऊ रवी याने तू तृतीयपंथी असून आमच्या घरी का आला. आमची बदनामी होते असे बोलून अश्लील भाषेत शिविगाळ केली. तर सावत्र आई व वडीलांनी चापटा-बुक्क्यांनी त्याला मारहाण केली. सावत्र भाऊ रवी याने कारच्या समोरील काचेवर दगड मारून चार हजार रुपयांचे नुकसान करून जिवे मारण्याची धमकी दिली.

प्रकरणी निकिता नारायण मुख्यादल वय ३५ याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी वडील नारायण दशरथ मुख्यादल, विमल नारायण मुख्यादल व रवी नारायण मुख्यादल रा. जुमडा या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार जयवंत सातव यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार रामेश्वर जायभाये हे करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...