आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई‎:अवैधरित्या वाळू वाहतूक‎ करणारा ट्रॅक्टर पकडला‎

मलकापूर पांग्राएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वाकद गावाजवळ‎ मंगळवारी सायंकाळी नायब‎ तहसीलदार डॉ. आसमा मुजावर यांनी‎ अवैधरीत्या वाळू वाहतूक करणारा‎ ट्रॅक्टर पकडून दंडात्मक कारवाई केली.‎ पकडलेला ट्रॅक्टर किनगावराजा‎ पोलिस ठाण्यात जमा करण्यात आला.‎ दिग्रस घाटावरून अवैधरीत्या‎ वाळूची तस्करी सुरू असल्याची‎ माहिती मिळताच नायब तहसीलदार‎ डॉ. आसमा मुजावर यांनी वाकद येथे‎ सापळा रचला.

विना क्रमांकाचा ट्रॅक्टर‎ रेतीची अवैधरीत्या वाहतूक करत‎ असल्याचे आढळून आले. ट्रॅक्टरमध्ये‎ एक ब्रास रेती असल्याचे निदर्शनास‎ आले. चौकशीदरम्यान हा ट्रॅक्टर‎ डिग्रस येथील अनंता विठोबा मांटे‎ यांचे असल्याचे समजले. त्यानुसार‎ मांटे यांच्यावर दंडात्मक कारवाई‎ करण्यात आली.‎

बातम्या आणखी आहेत...