आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहकारी गमावला:प्रमोद बोर्डे सारखा सच्चा मित्र, सहकारी गमावला

बुलडाणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अखिल भारतीय काँग्रेसचे महासचिव तथा राज्यसभेचे खा.मुकूल वासनिक यांनी २८ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील धाड, देऊळघाट, मोताळा, पिंपळगाव काळे येथे सांत्वनपर भेटी दिल्या. धाड येथे पत्रकार प्रमोद बोर्डे यांच्या निवासस्थानी भेट दिल्यानंतर एक सच्चा मित्र व चांगला सहकारी गमावल्याच्या भावना खा.मुकूल वासनिक यांनी व्यक्त केल्या. मागील काळात काँग्रेस पक्षातील काही कार्यकर्ते व त्यांच्या नातेवाइकांचे निधन झाले. त्यांच्या घरी जावून खा. वासनिक यांनी भेटी घेवून कुटुंबीयांचे सांत्वन केले.

खासदार झाल्यानंतर मुकूल वासनिक हे प्रथमच जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. खा.वासनिक यांचे खामगाव येथे आगमन झाले. त्यानंतर त्यांनी सुजातपूर येथे भेट देवून दुपारी धाड खा.मुकूल वासनिक यांनी प्रमोद बोर्डे यांचे किडनीच्या आजाराने निधन झाले होते. सांत्वनपर भेटीत आपण एका चांगल्या सहकारी व मित्राला मुकलो अशा भावना खा.मुकूल वासनिक यांनी व्यक्त केल्या. यावेळी नंदाताई बोर्डे, महेंद्र बोर्डे, अभिनय बोर्डे, पंकज बोर्डे, माधवी लोखंडे यांचे त्यांनी सांत्वन केले. यावेळी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राहुल बोन्द्रे, आ.राजेश एकडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष ॲड.गणेश पाटील, संजय राठोड, विजय अंभोरे, लक्ष्मनराव घुमरे, प्रा.संतोष आंबेडकर, माजी सभापती अंकुश वाघ, माजी सभापती दिलीपराव जाधव, नाना गावंडे, सुनील बोर्डे, महेंद्र बोर्डे, किशोर साखरे, निसार चौधरी,म.शफीक, रामविलास बुरुंगले, ॲड.वैशाली बोर्डे, दीपक रिंढे, विजय राजपूत, शेषराव सावळे, रवींद्र डाळिंबाकर, करुणा बोन्द्रे, प्रमिला जाधव यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान धाड येथे जि.प.सदस्य रिझवान सौदागर यांच्या वडीलाचे निधन झाल्यामुळे सौदागर यांच्या घरी जावून त्यांच्या कुटुंबींयाचे सांत्वन केले. त्यानंतर मोताळा येथे काँग्रेसचे नाना देशमुख यांचे कोरोना काळात निधन झाल्यामुळे त्यांच्या देखील भेट देवून त्यांंच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.तर पिंपळगाव काळे येथे डॉ.राजपूत यांच्या पत्नीचे निधन झाल्यामुळे डॉ.राजपूत यांच्या घरी जावून कुटुंबीयांचे सांत्वन केले.

बातम्या आणखी आहेत...