आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुचाकीला अपघात:भरघाव दुचाकीला अपघात; पती-पत्नी गंभीर जखमी; देऊळगावमहीतील धोत्रा-नंदई फाट्याजवळील घटना

देऊळगावमही4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नियंत्रण सुटल्याने भरधाव दुचाकी रस्त्याच्या बाजूला असलेल्या ३० ते ४० फूट खोलगट भागात कोसळल्याने पती-पत्नी जखमी झाले. ही घटना धोत्रा नंदई फाट्याजवळ ३ एप्रिल रोजी दुपारी घडली.

अंबड येथील इम्रान शेख शब्बीर (३५) व त्यांची पत्नी गोसिया अंजुम शेख इमरान (३०) हे दुचाकी क्रमांक एमएच २० ईएक्स ५००२ ने अमडापूर येथून गावाकडे जात होते. दरम्यान, धोत्रा नंदई फाट्याजवळ इम्रान शेख शब्बीर यांना भोवळ आली. त्यामुळे त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. यामुळे दुचाकी रस्त्याच्या बाजूला असलेल्या ३० ते ४० फूट खोल खड्ड्यात कोसळली. त्यामुळे दोघेही फेकले गेल्याने जखमी झाले.

दोन्ही जखमींना भाजप तालुकाध्यक्ष विठोबा मुंडे, पत्रकार गजानन भालेकर व मेरा येथील त्यांचे नातेवाइकांनी तातडीने येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. त्यांच्यावर प्रथोमचार करून पुढील उपचारार्थ जालना येथील रुग्णालयात हलवले.

बातम्या आणखी आहेत...