आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आग:वेल्डिंग करताना आग लागून वाहन जळून खाक; लाखो रूपयांचे नुकसान

मलकापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वेल्डिंग करत असताना अचानक वाहनास आग लागली. या आगीत वाहन पूर्णत: जळून खाक झाले आहे. ही घटना आज २ जून रोजी दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास फातिमा नगर भागात घडली.

शहरालगत असलेल्या फातिमा नगर भागातील जय हिंद वेल्डिंग वर्क्स या दुकानावर आज दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास वेल्डिंग करण्यासाठी एम एच २८/ ए.बी. / ७८८० या क्रमांकाचे वाहन आले होते. या वाहनाला वर्कशॉपचे मालक इमरान खान हे वेल्डिंग मारत असताना त्या वाहनांमध्ये अचानक शॉट सर्किट होवून वाहनास आग लागली. वाहनास आग लागल्याचे लक्षात येताच स्थानिकांची तारांबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच नगरसेवक प्रमोद अवसरमोल यांनी तातडीने पालिकेचे आरोग्य अधिकारी योगेश घुगे यांना दूरध्वनीवरून माहिती देत अग्निशामक दलास पाचारण करण्यास सांगितले. अग्निशामक दलाचे वाहन तात्काळ घटनास्थळी पोहोचले व वाहनाला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. ही आग एवढी भीषण होती की, या आगीत हे वाहन संपूर्ण जळून खाक झाले आहे. पुढील तपास सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...