आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोताळा‎:अवैध वाळूची वाहतूक करणारे वाहन पकडले‎

ऐवज जप्त‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळुची अवैधरीत्या वाहतूक करणारे टाटा‎ ४०७ वाहन बोराखेडी पोलिसांनी पकडले‎ आहे. ही कारवाई तरवाडी फाट्यावर ३१‎ जानेवारीच्या मध्यरात्री दोन वाजेच्या‎ सुमारास करण्यात आली आहे. यावेळी‎ पोलिसांनी वाहनासह अंदाजे ५ लाख ४‎ हजारांचा माल जप्त केला आहे. या प्रकरणी‎ तक्रारीवरून वाहन चालकाविरुद्ध बोराखेडी‎ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला‎ आहे.

या कारवाईमुळे वाळूची वाहतूक व‎ तस्करी करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ‎ उडाली आहे.‎ मागील काही दिवसांपासून तालुक्यातील‎ नदी-नाल्यांना वाळू तस्करांची नजर‎‎‎‎‎‎‎‎‎ लागली आहे. नदी-नाल्यातून अवैधरीत्या‎ वाळूचा उपसा करून त्याची सर्रास वाहतूक‎ करण्यात येत आहे. त्यामुळे नदी-नाल्यात‎ मोठमोठे खड्डे पडले आहेत.

दरम्यान,‎ मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास नांदुरा‎ तालुक्यातील येरळी येथील गणेश देविदास‎ दिवनाले हा एम.एच. २८/ ए.बी. / ४१४१ या‎ क्रमांकाच्या टाटा ४०७ मध्ये अवैधरीत्या‎ वाळूची वाहतूक करताना तरवाडी‎ फाट्यावर पोलिसांना मिळून आला.‎ यावेळी त्याच्याकडे वाळू वाहतुकीचा‎ परवाना मागितला असता त्याच्याकडे‎ कुठलाही परवाना आढळून आला नाही.‎

त्यामुळे पोलिसांनी ५ लाख रुपये किमतीचे‎ टाटा ४०७ वाहन व ४ हजार रुपये किंमतीची‎ एक ब्रास रेती असा एकूण ५ लाख चार‎ हजार रुपयांच्या माल जप्त करून वाहन‎ चालक गणेश दिवनाले यास ताब्यात घेतले.‎ या प्रकरणी पोलिस कर्मचारी गणेश वाघ‎ यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाहनचालक‎ गणेश दिवनाले यांच्या विरुध्द बोराखेडी‎ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील‎ तपास पोहेकॉ सुपडासिंग चव्हाण हे करीत‎ आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...