आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन महिलेवर अत्याचार

शेगाव24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओळखीतून मोबाइल नंबर घेऊन समाज माध्यमातून सलगी वाढवून लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार अकोला येथील ३९ वर्षीय महिलेने येथील शहर पोलिसांत ४ नोव्हेंबर रोजी दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी अकोला येथीलच एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अकोला शहरातील ३९ वर्षीय महिलेशी अकोल्यातीलच मो. अनिस मो. युनूस याने मोबाइल नंबर घेऊन व्हाट्सएपच्या माध्यमातून सलगी करून १५ डिसेंबर २०१९ रोजी बसने शेगाव येथे आणून मी माझ्या पत्नीची फारकत घेऊन तुझ्यासोबत लग्न करतो, असे आमिष दाखवून लैंगिक संबंध ठेवले.

या संबंधाचा चोरून व्हिडीओ बनवून त्याने तो व्हिडीओ तुझ्या नवऱ्याला दाखवून सर्व समाजात व्हायरल करेल अशी धमकी देत होता. मागील २४ ऑक्टोबर रोजी मो. अनिस याने पीडित महिलेस पुन्हा शेगाव शहरातील एका गेस्ट हाऊसवर नेऊन त्यांचा अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन जबरदस्तीने तिच्याशी शारिरिक संबंध ठेवले.

यावेळी महिलेने त्यास लग्नाबाबत विचारणा केली असता, त्याने लग्नास नकार दिला. तसेच पोलिसांत गेल्यास तुझ्यासह तुझ्या परिवारास मारून टाकील, अशा धमक्या दिल्या. या तक्रारीवरून शेगाव शहर पोलिसांनी आरोपी मो.अनिस मो. युनूस अकोला याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल कोळी हे करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...