आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैक्षणिक उपक्रम:चिंचोलीत गमतीच्या शाळेचा वर्षभर शैक्षणिक उपक्रम ; कोरोना काळातही साप्ताहिक अभ्यासमाला उपक्रम; 2 मे ते 26 जूनपर्यंत आयोजन

घाटंजी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील ग्रामीण भागातील एक छोटी शाळा, उपक्रमासाठी प्रसिद्ध असलेली शाळा म्हणजे येरंडगाव केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा चिंचोली, जेमतेम विद्यार्थी संख्या, आदिवासी बहुल क्षेत्रात असणारी, दारिद्र्य रेषेखालील गाव, २३० लोकसंख्या असलेले गाव. मोलमजुरी करून गुजराण करणारे पालक, आपल्या पाण्यासाठी कुठल्याही प्रकारे शिकवणी वर्ग लावण्यासाठी आर्थिक सुविधा नसणारे पालक वर्ग, अशा प्रकारे जीवन कंठत असतांना याच गावातील मुख्याध्यापक तथा सहा. अध्यापिका सन २०१४ पासून शाळेत अनेक शैक्षणिक उपक्रम राबवत आहे.

वर्ष भर शाळा, वर्ष भर दप्तर मुक्त शाळा अशाच प्रकारे एकुण ६५ शैक्षणिक उपक्रम आजमितीस शाळेतील शिक्षकांनी शाळेसाठी, विद्यार्थ्यांसाठी राबविले. कोरोना काळातही साप्ताहिक अभ्यास माला हा उपक्रम दोन वर्षे राबवण्यात आला. उन्हाळी सुट्टीत दोन ते तीन तास दररोज विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारचा उपक्रम शाळेत राबवत आहे.

याही वर्षी तारखेनुसार अभ्यास प्रत्येक वर्गासाठी ‘गमतीची शाळा या शैक्षणिक उपक्रमासाठी अभ्यासक्रम पुस्तिका तयार करून ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली आहे. २ मे ते २६ जुन पर्यंत असा उपक्रम सातत्याने राबविला जात आहे. नुकताच जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने महात्मा फुले स्वयं अध्ययन हा उपक्रम स्वयंसेवक निवडून राबवण्यासाठी घोषणा केली आहे. यासाठी याच शाळेतील माजी विद्यार्थी वैभव शेंडे, पवन लोखंडे स्वयंसेवक म्हणून स्वयंप्रेरणेने कार्य करण्यासाठी तयार झाले आहे. या आधीपासून शाळेत २०१४ पासून हा उपक्रम सातत्याने राबविला जात असून गावातील पालक वर्ग मुख्याध्यापक संजय तुरक आणि सहाय्यक अध्यापिका मनिषा तालपेलवार यांनी राबवलेल्या उपक्रमाचे कौतुक करत आहेत. निश्चितच हा शैक्षणिक उपक्रम विद्यार्थी हिताचा असुन कोरोना काळात झालेली विद्यार्थी वर्गाची शैक्षणिक हानी भरून काढण्यासाठी हितकारक ठरल्या जाणार हे निश्चित आहे.

बातम्या आणखी आहेत...