आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:विहिरीत कार पडून पत्नीसह मुलगी, बचाव करताना एक तरुणही ठार

देऊळगावराजाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पत्नीला कार शिकवण्याच्या प्रयत्नात भरधाव कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या विहिरीत कोसळली. या घटनेत पत्नीसह मुलीचा मृत्यू झाला, तर पती गंभीर जखमी झाला आहे. तसेच या घटनेत क्रेनला हूक अडकवण्याच्या प्रयत्नात एका युवकाचा विहिरीत पडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी ३ नोव्हेंबरला दुपारी एक वाजता घडली. यात स्वाती मुरकुट, सिद्धी मुरकुट (१२), पवन पिंपळे (२६) यांचा मृत्यू झाला.

चिखली रोडवरील रामनगर कॉलनीत शिक्षक अमोल मुरकुट हे कुटुंबासह वास्तव्यास असून ते जालन्यातील जाफराबाद पंचायत समितीअंतर्गत जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. गुरुवारी दुपारी ते पत्नी स्वाती, मुलीसह कारने प्रवास करत होते. या वेळी त्यांच्या पत्नी कार शिकत होत्या. रस्त्याने जाताना अचानक समोरून आलेल्या वाहनाने त्यांच्या वाहनाला कट मारला. त्यामुळे पत्नीचे वाहनावरील नियंत्रण सुटले. घाबरलेल्या पत्नीने ब्रेक मारण्याऐवजी चुकीने अॅक्सिलरेटर दाबले गेले. त्यामुळे भरधाव कार रस्त्याच्या बाजूच्या विहिरीत जाऊन कोसळली. स्थानिकांनी गंभीर जखमी अमोलला बाहेर काढले. परंतु स्वाती व सिद्धीचा मृत्यू झाला. त्यानंतर गाडी बाहेर काढण्यासाठी क्रेनचे हूक लावताना पवन विहिरीत पडला व त्याचा मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...