आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुप्तधनाची लालसा:सिल्लोडमध्ये तरुणाला विवस्त्र करून मारहाण, अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकल्याने पाय निकामी

खामगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बनकिन्होळा (ता. सिल्लाेड) येथे गुप्तधनासाठी एक तरुणाला विवस्त्र करून बेदम मारहाण करण्यात आली. यानंतर त्याच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकल्याने यात त्याचा पाय निकामी झाला आहे. उपचारासाठी त्याला औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांना त्याचा उजवा पाय मांडीपासून कापावा लागला. शुक्रवारी (दि. ९) हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. भगवान पुंडलिक खरात (३५) असे तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी तरुणाच्या आईने वडोदबाजार ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून जादूटोणा प्रतिबंधक व अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. तीन संशयितांना अटक केली आहे.

२७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता भगवान खरात हा किराणा सामान आणण्यासाठी गावात गेला असता तो परत आला नाही. २८ नाेव्हेंबर रोजी सकाळी गावातील प्रभू नत्थू फरकडे यांना भगवान हा एका नालीत बेशुद्ध अवस्थेत आढळला. त्यांनी कुटुंबीयांना कळवले. तेव्हा सगळ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याला तातडीने सिल्लोड येथे रुग्णालयात दाखल केले. त्याच्या पोटावर व पायावर चटके दिले होते, अशी तक्रार भगवानची आई मंडाबाई यांनी पोलिसात दिली आहे.

दरम्यान, संशयित आरोपी कचरू गोपाळ खरात, विठ्ठल एकनाथ फरकाडे, भाऊसाहेब विठ्ठल फरकाडे (सर्व रा. बनकिन्होळा, ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद) यांनी भगवानला मद्य पाजले. त्यानंतर अज्ञातस्थळी नेऊन त्याला विवस्त्र करून गुप्तधन काढण्यासाठी खड्डा खोदायला सांगितला. अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून त्याला मारहाण केली व एका नाल्यात भगवानला फेकून दिले होते.

वडोदबाजार ठाण्यात गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ ^ ६ डिसेंबरपर्यंत वडोद बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. तेव्हा मी भगवान खरात यांची घाटी रुग्णालयात भेट घेऊन पोलिसांना गुन्हा दाखल करण्यास सांगितले. पण ते सहकार्य करत नव्हते. अखेर पोलिस अधीक्षक (औरंगाबाद ग्रामीण) यांची भेट घेऊन निवेदन दिले तेव्हा एसपींनी गुन्हा दाखल करण्यास सांगितले शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला. -सतीश सुरडकर, सामाजिक कार्यकर्ता, औरंगाबाद.

बातम्या आणखी आहेत...