आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपेक्षा:चौदा वर्षांपासून बेपत्ता तरुण अखेर घरी परतला ; घरात पुन्हा आनंदाचे वातावरण

मलकापूर / धीरज वैष्णव8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गृहकलहातून गतिमंद झालेला एक तरुण चौदा वर्षांपूर्वी बेपत्ता झाला होता. शोध घेऊनही तो न सापडल्याने कुटुंबीयांनी अपेक्षा सोडली होती. परंतु, अचानक १८ नोव्हेंबर रोजी तो रा.स्व. संघाच्या प्रयत्नामुळेमदतीने निमखेड (ता. मलकापूर) येथील घरी परतला अन् घरात पुन्हा आनंदाचे वातावरण निर्माण झाले. पुण्यात बावधन येथे संघाची शाखा आहे. या शाखेच्या आसपास एक जण नेहमी फिरू लागल्याने काही स्वयंसेवकांच्या ताे नजरेत आला. स्वयंसेवकांनी त्याची विचारपूस केली. तेव्हा ताे गतिमंद असल्याचे लक्षात आले. चाैकशीत कधीकाळी आपणही संघाच्या शाखेमध्ये जात असल्याचे त्याने सांगितले. अधिक खुलाशानंतर तो मलकापूर येथील शाखेत जात हाेता.

शाखेतील प्रमोद डोरले उपाख्य भाऊसाहेब यांचे नाव त्याला आठवत होते.मलकापूर येथील प्रमोद डोरले यांच्याशी संपर्क साधून व्यक्तीविषयी माहिती देण्यात आली. डोरले यांनीही तालुक्यातील निमखेड गावात चौकशी केली असता किशोर हा १४ वर्षांपूर्वी बेपत्ता झाला असल्याची माहिती उघडकीस आली. १७ नोव्हेंबर रोजी मलकापूर येथील संजय गावंडे यांनी या व्यक्तीच्या चौकशीसाठी फोन आला असता गावातील त्या व्यक्तीच्या कुटुंबाच्या आशा पल्लवित झाल्या. याबाबत पुण्यातील रा.स्व.संघाच्या कार्यालयात तात्काळ कळवल्यावर त्याची महामंडळाच्या बसने पुणे ते मलकापूर येण्याची सोय करण्यात आली. १८ नोव्हेंबर रोजी सकाळी मलकापूर बसस्थानकात संजय गावंडे यांनी प्रत्यक्ष थांबून पुण्यावरून बस आल्यानंतर त्या व्यक्तीस स्वतःकडे बाेलावून ओळख पटवून त्याच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले.किशोर क्षीरसागर यांना आईवडील नाहीत. पुतण्याला मात्र त्यांनी तात्काळ ओळखले. त्यांना दोन मुली आहेत.

बातम्या आणखी आहेत...