आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात वृत्त:बोलेरो-दुचाकीच्या धडकेत माळविहिर येथील युवक ठार ; बुलडाणा-खामगाव रस्त्यावर वैष्णवी नगराजवळची घटना

बुलडाणा9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भरधाव बोलेरो पिकअप आणि दुचाकीचा समोरासमोर अपघात झाला असून या अपघातात माळविहिर येथील २६ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. बुलडाणा खामगाव रस्त्यावर वैष्णवी नगराजवळ १८ जून रोजी दुपारी दीड वाजता ही घटना घडली. प्राप्त माहितीनुसार, राहुल देवराव आडवे वय २६ असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. राहुल कामानिमित्त बुलडाणा येथे आला होता. काम आटोपून परत जात असताना खामगाव रोडवरील पोतदार स्कूलजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या बोलेरो पिक अपने जोरदार धडक दिली. या अपघातात राहुल जागीच ठार झाला.घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला. अपघातास कारणीभूत ठरलेल्या वाहनाला व वाहन चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून वृत्त लिहि पर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सम्राट ब्राम्हणे व पोकॉ श्रीकांत डोंगरदिवे करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...