आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:तीन रुग्णालयात निघेल नवजात बालकांचे आधार; जिल्हाधिकारी तुम्मोड यांची घोषणा

बुलडाणा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आधार ही आता सर्व ठिकाणी गरजेची बाब झाली आहे. त्यामुळे आधार नोंदणी आणि त्याचे अद्ययावतीकरणाला गती देणे गरजेचे आहे. त्यासोबतच नवजात ते पाच वर्षे वयोगटातील बालकांची नोंदणी होणे गरजेचे आहे. त्यासाठी बुलडाणा, शेगाव, खामगाव येथील शासकीय रूग्णालयात आधार नोंदणी केंद्र देण्यात येणार असल्याची घोषणा जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड यांनी केली तर त्याच ठिकाणी बालकांची लगेच नोंदणी होऊ शकेल. मोठ्या प्रसुतीगृहातही ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आधार नोंदणीबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी पोलिस अधीक्षक सारंग आवाड, यूआयडीएआयच्या उपसंचालक रुक्मिणी रामचंद्र, राज्याचे प्रकल्प व्यवस्थापक दीपक शिर्के, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस आदी उपस्थित होते. यावेळी पाच वर्षापर्यंतच्या बालकांची जनगणनेत नोंदणी होत नाही. त्यामुळे त्यांचा डाटा उपलब्ध नाही. परिणामी या बालकांची आधार नोंदणी कमी प्रमाणात होत आहे.

त्यामुळे येत्या काळात पाच वर्षापर्यंतची बालके लक्ष्य गट मानून आधार नोंदणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड यांनी दिले.अग्रणी बँकेने पुढाकार घेऊन आधार केंद्रासाठी बँकेत जागा उपलब्ध करून द्यावी. बँकेत फलक लावण्यात यावा, तसेच नागरिकांना आधारच्या सुविधा देण्यात याव्यात. अशा सूचनाही देण्यात आल्या.

आधार नोंदणीची किट अंगणवाडी व शाळांनाही
तालुकास्तरावर आधार नोंदणीची किट उपलब्ध करून देण्यात आली आहे. एखाद्या गावात सेवा केंद्र तात्पुरते स्थलांतरीत करण्याचे अधिकार तहसीलदारांना आहेत. अंगणवाडी आणि शाळांच्या मागणीनुसार आधार किट उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...