आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअल्पवयीन मुलीला नोकरीचे आमिष देत तिचे अपहरण केल्याचा आरोप करत या प्रकरणाची चौकशी करून आरोपीला पाठीशी घालण्यासाठी चुकीची तक्रार नोंदवणाऱ्या संबंधित पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात यावे, आरोपीसह सहआरोपींना अटक करण्यात यावी, आदी मागण्यांसाठी पीडित मुलीची आजी यमुनाबाई श्रीराम खराटे, आई सुनंदा श्रीराम खराटे यांनी सोमवारपासून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास सुरुवात केली आहे.
जळगाव जामोद पोलिस ठाण्याच्या हद्दीत १ ऑक्टोबर २०२२ रोजी अल्पवयीन मुलीला नोकरीचे आमिष देत तिचे अपहरण करण्यात आले. या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु गुन्हा दाखल होऊन तीन महिने झाले आहेत. परंतु अद्याप या प्रकरणाची राजकीय दबावामुळे साधी चौकशीही झाली नाही. त्यामुळे पीडित मुलीच्या माता-पित्याने आझाद हिंद शेतकरी संघटनेकडे न्यायासाठी मागणी केली होती.
या घटनेची गंभीर दखल घेत आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. सतीशचंद्र रोठे यांच्या नेतृत्वात आझाद हिंद शेतकरी संघटना व जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे व निदर्शने केले होते. दरम्यान, २८ डिसेंबर रोजी जिल्हा पोलिस अधीक्षक सारंग आवाड यांनी संबंधित ठाणेदारावर कारवाई करण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार दुसऱ्याच दिवशी जळगाव जामोदचे पोलिस निरीक्षक अंबुलकर यांची बदली करण्यात आली. परंतु अद्याप मुलीचा आणि आरोपींचा शोध लागला नाही, साधी चौकशी करण्यात आली नाही, आरोपीसह सहआरोपींना अटक करण्यात आली नाही. त्यामुळे या अपहरण प्रकरणाची चौकशी करून आरोपीस अटक करण्यात यावी, या मागणीसाठी खराटे परिवाराने आजपासून उपोषणास सुरूवात केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.