आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपहरण:चाकूचा धाक दाखवून महिलेसह मुलाचे अपहरण

खामगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

खामगाव तालुक्यातील गोंधनापूर येथील घरातून एका तीस वर्षीय महिलेसह तिच्या मुलाचे ऑटोतून अपहरण करण्यात आले. ही घटना बुधवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी वृद्ध महिलेच्या तक्रारीवरून ग्रामीण पोलिसांनी आठ जणांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

गोंधनापूर येथील सीताबाई समाधान सुलताने (६५) या महिलेने खामगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला तक्रार दिली की, बुधवारी रात्री सीताबाई सुलताने, तिची ३० वर्षीय मुलगी आणि नातू घरात असताना गावातील शेख रहिम शेख कादर, शेख अमजद, रवी मोहन सोळंके, शेख रफीक आणखी चौघांनी घरात प्रवेश केला.

यावेळी महिलेची मुलगी श्यामला गणेश मुंडे (३०) आणि तिच्या मुलाला जबरदस्तीने ऑटोमध्ये बसवले. पीडितेने आरडाओरड केली असता आरोपी रहिम शेख कादर याने चाकूचा धाक दाखवत मुलीचे अपहरण केले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी शेख रहिम शेख कादर, शेख अमजद, रवी मोहन सोळंके, शेख रफीक अधिक चौघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...