आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नराधमाविरुद्ध गुन्हा दाखल:सावत्र मुलीवर पित्याचा अत्याचार

बुलडाणा6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आठव्या वर्गात शिकणाऱ्या १४ वर्षाच्या मुलीला ३८ वर्षीय सावत्र बापाने तिच्या शाळेत जाऊन तुझी आई आजारी असून तिला हॉस्पिटलमध्ये भरती केले असल्याचे सांगत संभाजी नगर भागातील एका शेतात नेऊन मुलीवर अत्याचार केला. याबाबत चिखली पोलिस ठाण्यात नराधमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

प्राप्त माहितीनुसार, २८ जुलै रोजी १४ वर्षीय मुलगी शाळेतून उशीर झाल्यानंतरही घरी न आल्याने तिची आई मुलीचा शोध घेण्यासाठी शाळेत गेली असता मुलगी भेटली नाही. याबाबत आईने तिच्या वर्गशिक्षकांशी संपर्क करून विचारणा केली असता ती शाळेतून केव्हाचीच गेली असल्याची माहिती आईला मिळाली. त्यावेळी शाळेत हजर असणाऱ्या कर्मचाऱ्याने महिलेची समस्या बघत मुलीचा शोध सुरू केला.

सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मुलगी रडत-रडत शाळेच्या दिशेने येताना दिसून आली. तिला सोबत घेऊन शाळेतील कर्मचारी तिच्या आईजवळ गेला असता मुलीचे कपडे चिखलाने भरलेले व केसात गवत व माती चिटकून असल्याचे आईला दिसले. तिला तिच्या या अवस्थेचे व रडण्याचे कारण विचारले असता तिने आपल्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती आईला दिली. तिला त्याच अवस्थेत सोबत घेऊन आईने चिखली पोलिस स्टेशन गाठले. चिमुकलीने आपल्यावर झालेल्या अत्याचाराचे कथन केल्यावर पोलिसांनी तातडीने तिला वैद्यकीय उपचारासाठी चिखली ग्रामीण रुग्णालय येथे नेले व एक चमू आरोपीच्या शोधात रवाना झाली. याप्रकरणी पोलिसांनी कलम नराधमाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...