आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:आमीष दाखवून दोन महिलांवर अत्याचार‎

अंढेरा‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शेताची खरेदी बदलून देतो, असे‎ म्हणत दोन महिलांवर अत्याचार‎ केल्याची निंदनीय घटना‎ देऊळगावराजा तालुक्यातील‎ बायगाव खुर्द शिवारात १९ ते २९‎ डिसेंबर दरम्यान घडली. या प्रकरणी‎ शुक्रवार, ६ जानेवारी रोजी रात्री‎ साडे आठ वाजताच्या सुमारास‎ महिलेने दिलेल्या तक्रारीवरून‎ पोलिसांनी तिघांविरुद्ध‎ ॲट्रासिटीनुसार गुन्हा दाखल केला‎ आहे.‎

येथून काही अंतरावर असलेल्या‎ बायगाव खुर्द येथील तेवीस वर्षीय‎ महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार‎ गावातीलच आरोपी कारभारी‎ मुक्ताराम कायंदे, योगेश कारभारी‎ कायंदे व अनिल कारभारी कायंदे‎ यांनी आपली शेती नावावर करून‎ घेतली आहे.

या शेताची खरेदी‎ पलटून देतो, असे म्हणून अत्याचार‎ केला. तसेच आरोपीच्या मुलाने‎ तक्रारकर्त्या महिलेस निवडणुकीतून‎ माघार का घेत नाही. उलट शेतीची‎ खरेदी पलटून मागता, असे म्हणून‎ सामूहिक अत्याचार करत‎ जातीवाचक शिवीगाळ केली व‎ जीवे मरण्याची धमकी दिली. या‎ तक्रारीवरून पोलिसांनी उपरोक्त‎ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून‎ त्यांना अटक केली आहे. पुढील‎ तपास उपविभागीय पोलिस‎ अधिकारी विलास यामावर हे करत‎ आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...