आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपमुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा:समृद्धी महामार्गावर अपघाती ठिकाण, ओव्हर स्पीडची पूर्वसूचना देणारी यंत्रणा बसवणार

मेहकर9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

समृद्धी महामार्गावर इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम लावणार असून त्यामुळे ओव्हर स्पीड, अपघात घडेल असा स्पॉट तयार झाला असल्यास त्याची पूर्वसूचना देता येईल, अशी माहिती सोमवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

बुलडाणा जिल्ह्यात शिवणी पिसा गावाजवळील अपघाताच्या पार्श्वभूमीवर विधानसभेत आमदार संजय रायमूलकर यांनी समृद्धी महामार्गावरील पुलाजवळ येत असलेल्या अडचणी मांडल्या त्या वेळी उपमुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. रविवार, १२ मार्च रोजी सकाळी शिवणी पिसा गावाजवळील पुलावर भरधाव कार पुलावरील डांबराच्या पॅचवरून उसळून सुमारे ३०० फूट दूर जाऊन उलटली होती. या अपघातात छत्रपती संभाजीनगरचे ६ जण ठार, तर सात जण गंभीर जखमी झाले. या अपघाताचे पडसाद सोमवारी विधानसभेत उमटले. यावेळी आमदार रायमूलकर यांनी महामार्गावरील पुलाजवळ येणाऱ्या अडचणींकडे लक्ष वेधले. शिवणी पिसा नजीक पुलावर मोठ्या खाचा पडल्या आहेत. वाहन वेगात असताना ते चालकाच्या लक्षात येत नाही. वाहन पुलावर गेले की चालकाचे नियंत्रण सुटते. या प्रकारामुळे रविवारी झालेल्या अपघातात कारने चारवेळा पलटी मारली होती,असे त्यांनी सांिगतले. अपघातप्रवण स्थळांची चौकशी करून ते दुरुस्त करणार का? या अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना मदत जाहीर करणार का? असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले होते.

क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असल्यास प्रवेशाआधीच हटकणार :
या महामार्गावरील काही स्पॉटवर अपघात होतात. मुळात समृद्धी महामार्ग सरळ आहे, त्याला वळणे कमी आहेत. काही ठिकाणी मध्यंतरी माकडांचा वावर होता. अशा ठिकाणांची माहिती गोळा केली असून सुधारणा सुरू आहेत. त्यावर इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम लावत आहोत. त्यामुळे गाडीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्यास त्यांना प्रवेश करतानाच हटकले जाईल, तशा सूचना देण्यात आल्या आहेत, असे फडणवीस यांनी सांिगतले.

क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असल्यास प्रवेशापूर्वी प्रतिबंध
{ इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम बसवली जाईल.

{या यंत्रणेमुळे अति जलदगतीने धावणाऱ्या गाड्यांची सूचना तत्काळ यंत्रणेला मिळेल. त्यामुळे अपघातांचे प्रमाण घण्यास मदत.{धोकादायक अपघाती ठिकाणे (अॅक्सिडेंटल स्पॉट) असल्यास चालकांना पूर्वसूचना मिळेल. { गाडीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्यास त्यांना प्रवेश करतानाच हटकले जाणार, अन्यथा प्रतिबंध.

बातम्या आणखी आहेत...