आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील दगडवाडी येथील काही भाविक पंढरपूर यात्रेसाठी १९ जून रोजी रविवारी गावाकडून निघाले होते. पुणे येथे पोहोचल्यानंतर देहू येथे दर्शन घेऊन ते माउलीच्या दिंडीत सहभागी होण्यासाठी आळंदीकडे जाताना शिरजगाव चिखली, पुणे येथे त्यांना ट्रकने धडक दिली. यात एकाचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. एम.एच.१२/ क्यू.जी./३५६८ या क्रमांकाच्या ट्रकने त्यांना धडक दिली. या अपघातात भगवान साहेबराव घुगे वय ३० यांचा मृत्यू झाला आहे. तर बबन कारभारी जायभाये व पुंजाबाई भुसे हे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारार्थ पुणे येथे रुग्णालयात दाखल केले. मृत भगवान घुगे आई-वडिलांना एकुलता एक मुलगा होता. पहिल्या मुलाने आत्महत्या केली तर दुसऱ्या मुलाचाही मृत्यू झाला. पुणे येथील अमित, किशोर ढाकणे, गणेश महाराज यांनी जखमींना मदत केली. या घटनेची माहिती भास्कर जायभाये यांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.