आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कायदेशीर जनजागृती शिबिर:कायद्यानुसार सर्वांना प्रदूषण विरहित पाणी, हवा मिळवण्याचा अधिकार; न्यायाधीश साजिद आरिफ सय्यद यांचे प्रतिपादन

बुलडाणा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुळात पाणी आणि हवा हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. कायद्याने स्वच्छ पाणी आणि स्वच्छ हवा मिळवण्यासाठी काही मानक तयार केलेले असून आपल्या सर्वांना प्रदूषण मुक्त पाणी आणि हवा मिळविण्याचा अधिकार आहे. प्रत्येक पावसात आलेल्या पुरामुळे किंवा मोठ्या पावसामुळे वाहणारे पाणी जागो जागी अडवल्यास ते पाणी जमिनीत मुरते आणि पुन्हा तेच पाणी आपल्याला विहिरी आणि हापसी द्वारे प्राप्त होते त्यामुळे पावसाचे पाणी वाहुन वाया जावू नये याबाबत सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तरसाजिद आरिफ सय्यद यांनी केले

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बुलडाणा, तथा बुलडाणा जिल्हा वकील संघ यांचे संयुक्त विद्यमाने ३० मार्च रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बुलडाणा येथे दैनंदिन दिनदर्शिके प्रमाणे कायदेशीर जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. जिल्हा व विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष तथा जिल्हा सत्र न्यायाधीश स्वप्निल चं. खटी यांच्या मार्गदर्शनाखाली हे विधी साक्षरता शिबिर आयोजित केले होते

यावेळी साजिद आरिफ सय्यद म्हणाले की, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणा तर्फे नेहमी जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात येते. त्याअनुषंगाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बुलडाणा येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अॅड. विजयकुमार कस्तुरे यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग व जल संवर्धन तसेच सर्वांना पाणी व हवा मिळण्याचा अधिकार आहे, या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात प्राचीन काळा पासुन आज पर्यंत पाणी आणि माती संवर्धनासाठी कोणकोणत्या पद्धतीचा वापर कशा पध्दतीने करण्यात आला. याबद्दल उदाहरणे देवून सर्वांना माहिती दिली. त्याच प्रमाणे ‘मेघा रे मेघा रे’ आणि ‘पाणी वाढ ग बाई’ या गीत गायनाने स्वच्छ पाण्याचे महत्व सर्वांना पटवून दिले.

जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅड. विजय सावळे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सर्व वक्त्यांनी मांडलेल्या मुद्यांचा पुनरुच्चार करुन पाणी आणि हवेचे महत्व आपल्या जीवनाशी कसे निगडीत आहे. याबद्दल माहिती सांगितली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कर्मचारी गजानन मानमोडे, प्रवीण खर्चे, अॅड. सुबोध तायडे, वैभव मिलके तसेच अमोल लहाने यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमात जिल्ह्यातील सर्व समाजसेवक आणि समाजसेविका मोठ्या संख्येने हजर होते.

बातम्या आणखी आहेत...