आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस कारवाई:मोताळ्यात पाच किलो गांजासह आरोपी ताब्यात; 24 जून पर्यंत कोठडी

मोताळा4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्थानिक गुन्हे शाखा बुलडाणा तथा बोराखेडी पोलिसांनी येथील कॉटन मार्केट जवळ आदर्श नगर मध्ये पाच किलो गांजासह एकास ताब्यात घेतले आहे. यावेळी पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून साठ हजार रुपयाचा गांजा जप्त केला आहे. ही कारवाई २० जून रोजी दुपारी सव्वा वाजेच्या सुमारास करण्यात आली आहे. आरोपीस आज २१ जून रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास २४ जून पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

येथील कॉटन मार्केट परिसरात गांजाची विक्री होत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मनीष गावंडे यांच्या नेतृत्वात पथक तयार करण्यात आले. त्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक मनीष गावंडे, पोहेकॉ रामविजय राजपूत, दीपक लेकुरवाळे, नापोका गणेश पाटील, प्रवीण पडोळ, पोकॉ केदार फाळके, चालक सचिन जाधव बोराखेडी पोलिस ठाण्याचे नापोका अमोल खराडे, पोकॉ सदानंद हाडे, महिला पोलिस कर्मचारी उज्ज्वला पवार यांचा समावेश होता. या पथकाने २० जून रोजी दुपारी सव्वा वाजेच्या सुमारास कॉटन मार्केट जवळील आदर्श नगर मध्ये धाड टाकून साठ हजार रुपये किमतीचा पाच किलो गांजासह एकनाथ मोहिते यास ताब्यात घेतले आहे. आरोपीस आज येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास २४ जून पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पीएसआय अशोक रोकडे व पोकॉ आकाश यादव हे करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...