आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षा:पत्नीसह दोन मुलींचा खून करणाऱ्या आरोपी पित्यास जन्मठेपेची शिक्षा

मेहकरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

लोखंडी पहारीने वार करून पत्नी व दोन मुलींचा खून केल्याप्रकरणी आरोपी पित्यास जन्मठेपेची तसेच मुलाचा खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दहा वर्षाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायधीश एस. एम. चंदगडे यांनी बुधवारी सुनावली आहे.तालुक्यातील कासारखेड येथील आश्रुबा अंभोरे यांनी जानेफळ पोलिसांत दिलेल्या तक्रारी नुसार, भाऊ समाधान शेषराव अंभोरे याच्या घरात १२ मार्च २०१६ रोजी पहाटे दोन वाजता मारण्याचा आवाज आल्याने जाऊन पाहिले असता समाधान हा त्याची पत्नी व मुलासह मुलीला लोखंडी पहारीने मारत असल्याचे दरवाजाच्या खिंडीतून दिसून आले.

दरवाजा तोडून घरात प्रवेश केला असता समाधानची पत्नी मीना (४०), मुलगी अश्विनी (१५), अंकिता (१३) व सहा वर्षीय मुलगा गोपाल जखमी अवस्थेत दिसून आले. चारही जखमींना येथील दवाखान्यात नेण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी तपासणी करून अश्विनीला मृत घोषित केले. त्यानंतर तीन जखमींना औरंगाबादला हलवण्यात आले.

त्या ठिकाणी पत्नी मीना व मुलगी अंकिता हिचा मृत्यू झाला तर मुलगा गोपाल वाचला. पोलिसांनी आरोपी समाधान अंभोरेविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी वकील ॲड. जे. एम. बोदडे यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने समाधान शेषराव अंभोरे यास पत्नी, मुलींचा खून केल्याबद्दल जन्मठेप, मुलाच्या खुनाचा प्रयत्न केल्याबद्दल दहा वर्षे सश्रम कारावास तसेच ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

बातम्या आणखी आहेत...