आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराथकीत वीज देयकाच्या वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या पथकातील तंत्रज्ञास शिवीगाळ करत मारहाण केल्याप्रकरणी बुलडाणा न्यायालयाने एकास दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. हा निकाल प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश स्वप्निल खटी यांनी दिला.
पाच वर्षांपूर्वी २१ नोव्हेंबर २०१७ रोजी महावितरणचे तंत्रज्ञ संजय शंकर बावणे व त्यांच्या सहकारी आरती बावणे या बुलडाणा शहरातील मिलिंदनगर परिसरात थकबाकी वसुलीसाठी गेले होते. पूर्णाबाई दशरथ झिने यांच्याकडे जवळपास ७ हजार ३० रुपयांची थकबाकी मागण्यासाठी गेले असता तेथे बबन दशरथ झिने याने त्यांच्या अंगावर जाऊन त्यांना शिवीगाळ करून मारहाण करत दमदाटी केल्याची तक्रार बावणे यांनी बुलडाणा शहर पोलीस स्टेशनला केली होती.
या प्रकरणी पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. हे प्रकरण सुनावणीसाठी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश स्वप्निल खटी यांच्यासमोर आले. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकूण ८ साक्षीदार तपासण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने त्यास शिक्षा सुनावली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.