आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस कोठडी:नवजात अर्भक गाडणाऱ्या आरोपींना पोलिस कोठडी

मलकापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अत्याचारा नंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मुलीचे अर्भक शेतात गाडल्या प्रकरणी पीडितेच्या वडील व भावास पोलिसांनी गुरुवारी दुपारी अटक केली. दरम्यान, आज आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ५ डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिल्याची माहिती ग्रामीण पोलिस निरीक्षक फरहात मिर्झा यांनी दिली आहे.

तालुक्यातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा रस्त्यावर दोघांनी हात धरून जबरीने अत्याचार केला. ऑगस्ट महिन्यात घडलेल्या या घटनेनंतर २६ नोव्हेंबर रोजी पीडित तरुणीने अर्भकास जन्म दिला.

परंतु बदनामीच्या भीतीपोटी मुलीच्या वडिलांसह भावाने त्या अर्भकाचा शेतातच दफनविधी केला. या प्रकरणी गावातील व्यक्तीच्या तक्रारीवरून चाइल्ड वेल्फेअर ट्रस्ट मुंबईची टीम सक्रिय झाली. त्यानंतर समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्या अल्पवयीन मुलीस ताब्यात घेऊन तिचा जबाब नोंदवला. त्यांनी दिलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी आरोपी विरुध्द बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता.

बातम्या आणखी आहेत...