आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोपी जेरबंद:गुटख्याची वाहतूक करणारा आरोपी जेरबंद; ही कारवाई आज 9 मे रोजी करण्यात आली आहे

बुलडाणा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या एका आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या शिताफीने जेरबंद केले आहे. यावेळी त्याच्या ताब्यातून ८२ हजार ४७८ रुपये किमतीचा विमल व वाह या कंपनीचा गुटखा व दीड लाख रुपये किमतीचा ॲटो असा एकुण २ लाख ३२ हजार ४७८ रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई आज ९ मे रोजी करण्यात आली आहे. स्थागुशाचे पोलिस निरीक्षक बळीराम गिते यांनी गुटखा तस्करांवर कारवाई करण्यासाठी एक पथक स्थापन केले. आज सोमवारी सकाळी हे पथक हे शहरात अवैध व्यवसायांवर कार्यवाही केली.

बातम्या आणखी आहेत...