आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदेश:ट्रॅक्टर खरेदी फसवणूक प्रकरणी आरोपीस एक वर्षाची शिक्षा

संग्रामपूर10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ट्रॅक्टर खरेदी फसवणूक प्रकरणी येथील न्यायालयाने आरोपीस एक वर्षाची शिक्षा तसेच दीड लाखाचा दंड ठोठावला आहे. दंडाची रक्कम ही फिर्यादीस देण्याचे आदेश दिले आहेत. हा निकाल २१ नोव्हेंबर रोजी देण्यात आला आहे. टुनकी येथील फिर्यादी आझादसिंग तारासिंग भाटिया यांच्या सोबत आरोपी सय्यद अकमल सय्यद बरकत अली मुसा रा. बहादूरपुरा मंगळूरपीर जि. वाशीम याने ट्रॅक्टर खरेदीसाठी १ लाख ९० हजार रुपयाचा व्यवहार केला होता. व बरकत अली याने भाटिया यांना रोख चाळीस हजार रुपये दिले.

उर्वरित रक्कम लक्ष्मी फायनान्सच्या माध्यमातुन देण्याचे ठरले होते. परंतु उर्वरित रक्कम आरोपीने भरणा न केल्याने व खोटे दस्ताऐवज बनवून फसवणूक केली. याबाबत आझादसिंग तारासिंग भाटिया यांनी २९ जुन २०१२ रोजी तामगाव पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीवरुन सय्यद अकमल सय्यद बरकत अली मुसा रा. मंगरूळपीर विरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर तपास अधिकारी एएसआय रामराम राठोड यांनी दोषारोप पत्र प्रथम न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयात दाखल केले. सरकार पक्षाच्या वतीने फिर्यादीसह सात साक्षीदार तपासले.

युक्तीवाद ऐकून येथील प्रथम वर्ग न्यायधीश यु. एस. इवरे यांनी बरकत अली यास एक वर्षाची शिक्षा व दंडाची रक्कम फिर्यादी भाटिया यांना देण्याचे आदेश दिले. सरकार पक्षाच्या वतीने ॲड. राहुल राहणे यांनी कामकाज पाहिले. त्यांना ॲड. निवृत्ती वाघ यांनी सहकार्य केले.

बातम्या आणखी आहेत...