आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लैंगिक अत्याचार:आरोपीस सश्रम कारावासाची शिक्षाच;खामगाव येथील न्यायालयाचा निकाल

खामगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका ३८ वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस बारा वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा येथील न्यायालयाने ठोठावली आहे. ही घटना जळगाव जामोद येथील आहे. हा निकाल खामगाव येथील जिल्हा न्यायाधीश एक तथा अतिरिक्त सत्र न्यायधीश श्रीमती ए. एस. वैरागडे यांनी आज ९ मे रोजी दिला आहे.

जळगाव जामोद शहरातील न्हावी पुरा भागातील एक ३८ वर्षीय अविवाहित महिला ही दिव्यांग असून ती तिच्या वडिलां सोबत राहते.दरम्यान, २८ ऑगस्ट २०१७ रोजी तिचे पोट दुखत असल्याने तिला तिच्या वहिनीने जळगाव जामोद येथील खासगी रुग्णालयात नेवून तिची तपासणी केली असता ती तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तेव्हा तिच्या वहिनीने तिला विचारणा केली असता, तिने हकीकत सांगितली की, ती सुनगाव रोडने बकरीचा चारा आणण्यासाठी गेली असता नीलेश जाधव वय २५ रा. सुनगाव वेस जळगाव जामोद याने चाकूचा धाक दाखवून वेळोवेळी लैंगिक अत्याचार केला. ही घटना मंगेश राऊत याने पाहिली होती.

घटनेबाबत महिलेच्या वहिनीने १३ सप्टेंबर २०१७ रोजी तक्रार दिली. यावरून पोलिसांनी आरोपी नीलेश जाधव विरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली होती. तेव्हापासून आरोपी हा कारागृहात आहे. या प्रकरणाचा तपास नीलेश सरदार यांनी करून प्रकरण न्याय प्रविष्ट केले. दरम्यान, त्या अत्याचारग्रस्त महिलेची ९ मार्च २०१८ रोजी अकोला येथील सरकारी रुग्णालयात प्रसूती करण्यात आली असता तिने एका मुलीला जन्म दिला. त्या दोघींनाही बुलडाणा येथील बालगृहात ठेवण्यात आले. नंतर बाळ व त्याची आई व आरोपीची डीएनए चाचणी केली .

या प्रकरणाची आज ९ मे रोजी येथील न्यायालयात सुनावणी करण्यात आली. सरकारी पक्षाच्या वतीने १२ साक्षीदार तपासण्यात आले. प्रादेशिक न्याय वैद्यक विज्ञान शाळा नागपूरच्या सहायक रासायनिक विश्लेषक ए. व्ही. दीक्षित यांची साक्ष महत्वाची ठरली. मंगेश राऊत हा फितूर झाला. अत्याचारग्रस्त महिला दिव्यांग असल्याने न्यायालयात तिची साक्ष मूकबधिर विद्यालयाचा शिक्षिका बगेरिया यांच्या सहाय्याने घेण्यात आली. साक्षीदारांची साक्ष व सरकारी अभियोक्ता राजेश्वरी आळशी यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपी नीलेश जाधव यास शिक्षा ठोठावली. कोर्ट पैरवी म्हणून काशीनाथ तायडे यांनी सहकार्य केले.

बातम्या आणखी आहेत...