आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैशाची मागणी:व्यापाऱ्यास धमकी देणारा आरोपी अटकेत ; ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार

शेगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील व्यापाऱ्याला जिवाने मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीस शेगाव शहराच्या डीबी पथकाकडून सुरत येथून अटक केली आहे. व्यापारी शंकरलाल भुतडा यांच्याकडे आरोपीने फोनवरून पैशाची मागणी केली होती व पैसे न दिल्यास ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार भुतडा यांनी शहर पोलीस स्टेशनला दिली होती. त्यावरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात केला होता. हा तपास उपनिरीक्षक नितीन इंगोले यांच्याकडे देण्यात आला. डीबी पथकाला गुन्ह्यातील आरोपी हा सुरत गुजरात येथे असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपी शेख उमर फुरकान अब्दुल सलाम(२१), रा.पंचशीलनगर, भाटेना, सुरत येथून अटक केली आहे.

बातम्या आणखी आहेत...