आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कचरा व्यवस्थापन:कचरा व्यवस्थापनात सुधारणा करून ‘डेअरी नेट झिरो’ गाठा : डॉ. श्वेता धांडे

बुलडाणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

२०२२ मधील जागतिक दूध दिनाची थीम ही हवामान बदलाच्या संकटाकडे लक्ष वेधून घेणे आणि डेअरी उद्योग पर्यावरणावरील प्रभाव कसा कमी करू शकतो याकडे लक्ष वेधणे अशी आहे. हरितगृह वायू उत्सर्जन कमी करून आणि पुढील तीस वर्षात कचरा व्यवस्थापनात सुधारणा करून ‘डेअरी नेट झिरो’ गाठण्याचे उद्दिष्ट आहे, असे प्रतिपादन प्रा. श्वेता धांडे यांनी केले. अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाशी संलग्न देऊळगावराजातील समर्थ कृषी महाविद्यालयात बुधवारी जागतिक दूध दिवस साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्रा. मोहजीतसिंग राजपूत होते. दरम्यान, प्रा. राजपूत यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, जागतिक अन्न आणि कृषी संशोधन परिषदेच्या निर्देशानुसार २००१ पासून दरवर्षी १ जून रोजी संपूर्ण जगभरात ‘जागतिक दूध दिन’ साजरा केला जातो. मानवी शरीराला दुधाची असलेली गरज आणि त्याचे महत्त्व पटवून देण्यासाठीच जागतिक दूध दिन साजरा केला जातो. तसेच लोकांपर्यंत दुधाचा प्रचार आणि प्रसार करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. तर हा दिवस साजरा करण्याचा उद्देश दुधाच्या सर्व पैलूंच्या बाबतीत सामान्य जनतेमध्ये जागरुकता निर्माण करणे असा आहे. जागतिक दूध दिवसाद्वारे लोकांना दुधाचे उत्पादन, दुधाच्या पौष्टिकतेचे महत्त्व आणि दुधाच्या विविध उत्पादनासह त्याचे आर्थिक महत्त्व यावेळी प्रा. राजपूत यांनी समजावून सांगितले. याप्रसंगी महाविद्यालयातील पशू संवर्धन व दुग्ध शास्त्र विभागाचे प्रा. सचिन गोरे यांनी विद्यार्थ्यांना निरोगी आहारासाठी दूध हे सर्वात महत्वाचे पोषक घटक आहेत. हे केवळ आवश्यक प्रथिने, चरबी आणि जीवनसत्त्वेच देत नाही तर दुधाचे इतर अनेक फायदे देखील आहेत असे सांगितले. सूत्रसंचालन व आभार रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. शुभम काकड यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला प्रा. विलास सातपुते, प्रा.सचिन सोळंकी व विद्यार्थी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...