आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक आरोपी फरार:बनावट दारूसाठी झाकण बाळगणाऱ्यांवर कारवाई ; राज्य उत्पादन शुल्कची मोहिम

बुलडाणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बनावट विदेशी दारूसाठी प्लास्टिकचे झाकण बाळगणाऱ्या दोन जणांविरुद्ध कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे. एक आरोपी फरार झाला. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने करण्यात आली.राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव यांच्या मार्गदर्शनात गणेशोत्सव काळात अवैध दारूची वाहतूक, निर्मिती आणि विक्री विरोधात कारवाई करण्यात येत आहे. ३१ ऑगस्टला बुलडाणा ते खामगाव रस्त्यावरील वरवंड शिवारातील दिव्य सेवा फांउडेशनसमोर पथकाने एमएच ३० एई १४०५ या क्रमांकाच्या इंडिका कारची तपासणी केली असता, कारमध्ये बनावट विदेशी मद्यासाठी वापरण्यात येणारे पाच हजार नवीन झाकणं महेंद्र नामदेवराव गोदे, रा. भारती प्लॉट, बाळापूर नाका अकोला व श्रीकृष्ण दादाराव गावंडे, रा. घुसर, ता. जि. अकोला या दोघांच्या ताब्यातून जप्त केले. कारसह १ लाख ७३ हजार ८० रुपयांचा माल जप्त करून आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. ३ सप्टेंबरला चिखली ते मेहकर रस्त्यावरील लव्हाळा चौफुली येथे सापळा रचून एमएच २८ बीके ६६८४ क्रमांकाच्या कारमधून देशी दारूचे ३ लाख ९ हजार रुपये किमतीचे १७ बॉक्स जप्त करून श्याम किसन चांगाडे, पवन सुभाष अवसरे, दोघेही रा. अमडापूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...