आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:भोनगाव शिवारात वाळूचे अवैध उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई

शेगाव13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील काही दिवसांपासून तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीस उधाण आले आहे. रात्री बेरात्री नदी नाल्यातील अवैध वाळूचे उत्खनन करून त्याची सर्रास वाहतुक करण्यात येत आहे. या बाबतची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांच्या पथकाने भोनगाव शिवारात धाड टाकून पाच ट्रॅक्टरसह एक जेसीबी जप्त केला आहे. या धडक कारवाईमुळे अवैधरीत्या वाळूचे उत्खनन व वाहतुक करणाऱ्या वाळू तस्कराचे धाबे दणाणले आहेत.

मागील काही दिवसांपासून तालुक्यातील नदी नाल्यांना वाळू तस्कराची काळी नजर लागली आहे. दिवस-रात्र या नदी नाल्यातून अवैध वाळूचा उपसा करून त्याची सर्रास वाहतूक करण्यात येत आहे. परतु वाळू तस्करांवर कारवाई न करता महसूलचे अधिकारी आर्थिक गणित जुळवून घेत वाळू वाहतुकीस हिरवी झेंडी देत असल्याचे या कारवाईतून दिसून येत आहे.

आज मिळालेल्या माहिती वरून अतिरिक्त पोलिस अधीक्षक यांच्या पथकाने तालुक्यातील भोंनगाव शिवारात आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास धाड टाकली असता नदीतून एक जेसीबी आणि पाच ट्रॅक्टर हे वाळू उपसा करीत असल्याचे दिसुन आले. त्यानंतर पथकाने ही वाहने ग्रामीण पोलिस ठाण्यात जमा केली आहेत. वृत्त लिही पर्यंत पुढील कारवाई सुरू होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात वाळूची वाहने पकडल्याने वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

बातम्या आणखी आहेत...