आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागोरेगाव फाट्यावर बुवाबाजी च्या नावाखाली प्रार्थनेच्या नावाखाली दर रविवारी दुर्धर महिला व पुरुषांची तपासणी व उपचार केले जातात. भूलथापा देणाऱ्यांविरूद्ध कारवाई व्हावी. तसेच धर्मांतराबाबत आक्षेप घेत चौकशी व्हावी म्हणून बजरंग दल, विहिंपने तक्रार केली होती. याची दखल घेत प्रभारी पोलिस अधीक्षक श्रवण दत्त यांनी साखरखेर्डा गाठून शांतता समितीच्या बैठकीत चौकशीअंती संबंधितांवर कारवाई केली जाईल असे सांगितले व त्यानुसार कारवाई केली.
आरोप झाल्यानंतर पोलिस अधीक्षक दत्त यांनी कव्हळे यास परवानगी घेऊन कायदेशीरपणे फक्त प्रार्थना घ्यावी, अशा सूचना दिल्या. मात्र त्यास परवानगी दिल्यास आम्ही हनुमान चालिसाची परवानगी घेऊ नाकारल्यास बेकायदेशीरपणे आम्ही हनुमान चालिसाचे पठण करण्याचा इशारा बजरंग दलाचे जिल्हाध्यक्ष अमोल अंभोरे यांनी दिला आहे.
दरम्यान, पोलिस अधीक्षक दत्त, उपविभागीय पोलिस अधिकारी विलास यामावार, ठाणेदार जितेंद्र आडोळे यांनी दोन्ही गटांच्या बाजू समजून घेत योग्य कारवाईचे संकेत पोलिस अधीक्षक दत्त यांनी दिले होते. यावेळी विजय पवार, रावसाहेब देशपांडे, सतीश गुप्त, गोपाल पाझडे, गोपाल ठाकूर, जालम ठाकूर, दिलीप बेंडमाळी, दामुअण्णा शिंगणे, विश्वनाथन आप्पा जितकर, पुरूषोत्तम डिवटे, वैभव मानतकर, यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. पोलिस अधीक्षक श्रवण दत्त यांनी आदित्य तिवारी यांच्या तक्रारीवरून द ब्युटी ट्युडस ख्रिश्चन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष दिलीप तुळशीराम कव्हळे, नीलेश गुलाबराव कव्हळे, विकास रमेश गोफने यांच्यावर गुन्हे दाखल करून आरोपी ताब्यात घेतले असून दि.२८ जुलै रोजी सकाळपासून पोलिस अधीक्षक साखरखेर्डा पोलिस ठाण्यात तळ ठोकून होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.