आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई‎:अतिक्रमणाच्या हरकतीवरील सुनावणी‎ नंतर होणार कारवाई‎

खामगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने‎ शासकीय जागांवरील अतिक्रमण काढण्याच्या‎ हालचाली सुरु झालेल्या असून नगर पालिका‎ प्रशासनाने आतापर्यंत शहरातील ७००‎ अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावल्या असून‎ यापैकी २०० जणांनी याबाबत हरकती नोंदवल्या‎ आहेत. शासकीय व गायरान जमिनीवरील‎ अतिक्रमण काढण्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने‎ आदेश निर्गमित केलेले आहेत. त्यानुसार‎ उपविभागीय अधिकारी, तहसीलदार,‎ मुख्याधिकारी यांच्यावर अतिक्रमण कारवाई‎ करण्याची जबाबदारी देण्यात आलेली असून ३१‎ डिसेंबरपर्यंत सर्व अतिक्रमण काढण्याचे स्पष्ट‎ निर्देश देण्यात आलेले आहे.

त्यानुसार खामगाव‎ नगर पालिकेच्या वतीने शहरातील ७०० अतिक्रमण‎ धारकांना नोटिसा देण्यात आलेल्या आहेत. यावर‎ हरकती नोंदवण्यासाठी मुदत देण्यात आलेली‎ असून आतापर्यंत शहरातील २००‎ अतिक्रमणधारकांनी आपल्या हरकती नोंदवल्या‎ असल्याची माहिती न.प.प्रशासनाच्या वतीने देण्यात‎ आली आहे. हरकतींवर सुनावणी होवून शासकीय‎ जागेवरील अतिक्रमण असल्याचे सिध्द झाल्यानंतर‎ अतिक्रमण काढण्याची कारवाई केली जाणार आहे.‎ आता या हरकतींवर काय निर्णय होतो, याकडे‎ सर्वांचे लक्ष लागले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...