आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवकांना आवाहन:स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव काँग्रेस पदयात्रेत सक्रिय सहभाग नोंदवा

चिखली9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

संपुर्ण देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत असून ९ ते १५ ऑगस्ट दरम्यान राज्यभरात काँग्रेसच्या वतीने पदयात्रा काढण्यात येणार आहे. या पद यात्रेदरम्यान स्वातंत्र्य प्राप्तीनंतर काँग्रेस पक्षाने देशाच्या आर्थीक, सामाजिक स्तराबरोबरच सर्व सामान्यांच्या हितासाठी केलेल्या कार्याची माहिती देण्यात येणार आहे. युवकांना काँग्रेस पक्षाच्या मुख्य विचार धारेत सहभागी करून घेण्याचे उद्दिष्ट गाठण्याकरता या पदयात्रेत सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवा, असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी केले आहे.

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी भवनात चिखली विधानसभा काँग्रेसच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या तयारीसाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक पार पडली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहुल बोंद्रे होते. दरम्यान बैठकीला प्रा.विनोद पऱ्हाड, समाधान सुपेकर, सुनील तायडे, नंदकिशोर शिंदे, विष्णु पाटील, सुधाकर धमक, डॉ. सत्येंद्र भुसारी, राम जाधव, डॉ. संतोष वानखेडे, गजानन लांडे, गणेश जवंजाळ, जगन्नाथ जाधव, अरूण शेळके यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी मोहन जाधव, जगन्नाथ पाटील, डॉ. इसरार, दिलीपराव जाधव, अशोकराव पडघान, नंदू सवडतकर, महिला कॉग्रेसच्या अध्यक्षा संगीता गाडेकर, विद्या देशमाने, शिवदास रिंढे, बद्री वाघ, सचिन बोंद्रे, आसिफ भाई, दीपक खरात, राजू रज्जाक, गोपाल देव्हडे, प्रदीप अंभोरे, प्रदीप पचेरवाल, नीलेश अंजनकर, रूपराव सावळे,पंजाबराव आंभोरे, भानदास थुट्टे, सिद्धेश्वर परिहार, छगन टेकाळे, किशोर सोळंकी, राम डहाके, मनोज लाहुडकर यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नितीन जाधव यांनी तर आभार प्रदर्शन किशोर कदम यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...