आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आक्रमक:चिखलीतही कार्यकर्ते आक्रमक

चिखलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानचे विदेश मंत्री बिलावल भुट्टो यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेल्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ आज १७ डिसेंबर रोजी आमदार श्वेता महाले पाटील यांच्या नेतृत्वात शहरात निषेध आंदोलन करण्यात आले.

या निषेध आंदोलनात पाकिस्तानी झेंडे, पाकिस्तानचे नकाशे व बिलावल भुत्तोचा पुतळा जाळून निषेध करण्यात आला. यावेळी पाकिस्तान मुर्दाबाद, बिलावल भुट्टो मुर्दाबाद, भारत माता की जय अशा घोषणा देवुन कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला होता. या आंदोलनात भाजपा शहराध्यक्ष पंडितदादा देशमुख, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रतापसिंग राजपूत, सुरेशअप्पा खबुतरे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते

बातम्या आणखी आहेत...