आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विज्ञान प्रदर्शन:राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात अदिती मंजुळकरचे यश ; तीन दिवसीय भव्य दिव्य प्रदर्शन

खामगाव8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजीव गांधी सायन्स टेक्नॉलॉजी कमिशन महाराष्ट्र शासन यांचे सायन्स सेंटर बारामती यांच्या मार्गदर्शना १५ ते १७ जून दरम्यान राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जवाहर नवोदय विद्यालय शेगावची विद्यार्थिनी अदिती निवृत्ती मंजुळकर हिने नाविन्यपूर्ण असा प्रकल्प सादरीकरण करून राज्यस्तरावर पारितोषिक मिळविले. या प्रकल्पास उज्वल मूखवाने, नवोदय विद्यालयाचे मुख्याध्यापक कसर, इंग्लिश कॉन्व्हेंट बोथाकाजीचे सागर उकर्डे यांचे मार्गदर्शन लाभले. अदिती हिने तिच्या कौशल्य शक्तीतून परीक्षकांसमोर उत्तम असे, प्रकल्प सादरीकरण केले.

या तीन दिवसीय भव्य दिव्य प्रदर्शनामध्ये नामांकित शास्त्रज्ञां सोबत चर्चा सुद्धा घडवून आली. या प्रदर्शनामध्ये भारतातील नामांकित शास्त्रज्ञ, डॉ.अनिल काकोडकर, डॉ.राकेश जोशी, डॉ. शिल्पा खुशवाह उपस्थित होते. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. आपल्या यशाचे श्रेय त्यांनी आई-वडिलांना दिले आहे.

बातम्या आणखी आहेत...