आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोप:आदित्य यांच्या सभेला परवानगी नाकारली; पोलिस म्हणतात, फक्त स्थळातच बदल

बुलडाणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे हे ७ नोव्हेंबर रोजी बुलडाणा शहरात येत आहेत. या निमित्त त्यांची बुलडाणा येथील गांधी भवन येथे होणाऱ्या सभास्थळी पोलिसांनी परवानगी नाकारली असल्याचा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना करत आहे. मात्र पोलिसांनी आपण परवानगी नाकारली नसून फक्त स्थळ नाकारल्याचे दिव्य मराठीशी बोलताना सांगितले.

सिल्लोड येथील आदित्य ठाकरे यांची सभा नाकारल्याच्या चर्चा शुक्रवारी चर्चेत असतानाच आज सकाळी बुलडाण्यातही आदित्य ठाकरे यांची सभा नाकारल्याच्या चर्चेला उधाण आले होते. या बाबत जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी आपणही सकाळी सभेला परवानगी नाकारल्याचे ऐकले आहे. याबाबत संघटनात्मक पातळीवर निर्णय घेणार असून बैठकीनंतर आम्ही काय तो निर्णय घेणार आहोत. ज्या गांधी भवनात सर्वच सभा होतात तेथे आदित्य ठाकरे यांचे सभेला पोलिसांनी का विरोध करावा, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

याबाबत पोलिसांनीच स्पष्ट काय ते सांगणे योग्य राहील,अशी भूमिका बुधवत यांनी मांडली. दरम्यान, बुलडाणा शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रल्हाद काटकर यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी परवानगी नाकारली नसल्याचे सांगितले. गांधी भवना ऐवजी सभेचे स्थळ कायदा व सुव्यवस्थेची अडचण लक्षात घेता दुसरे बदलून मागावे, असा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत तरी कोणी दुसऱ्या स्थळाची मागणी व परवानगी घेण्याकरता आपल्यापर्यंत पोहोचला नसल्याचे त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...