आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांना निवेदन‎:सिंदखेडराजा नामांतराच्या‎ प्रस्तावाला स्थगिती द्या‎ ; शिवसंग्राम संघटनेची मागणी

देऊळगावराजा‎23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिंदखेडराजा शहराच्या‎ नामांतराबाबत शासनाकडे‎ पाठविण्यात आलेल्या प्रस्तावास‎ स्थगिती देऊन बुलडाणा जिल्ह्याचे‎ नामकरण //"राजमाता जिजाऊ नगर’‎ करण्यात यावे, अशी मागणी‎ शिवसंग्राम संघटनेने केली आहे. या‎ संदर्भात पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री‎ एकनाथ शिंदे यांच्यासाठी‎ उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे‎ यांना निवेदन दिले.‎ निवेदनात नमूद आहे की,‎ सिंदखेडराजा ही राजे लखुजीराव‎ जाधव यांची राजधानी होती.‎

राष्ट्रमाता जिजाऊंचे हे जन्मस्थळ‎ असून, या शहराला व नावाला‎ ऐतिहासिक महत्त्व आहे.‎ स्थानिक नागरिकांच्या भावना‎ लक्षात घेऊन सिंदखेडराजाचे‎ नामांतर करू नये. तसेच बुलडाणा‎ जिल्ह्याचे नाव //"राजमाता जिजाऊ‎ नगर//" करण्याचा प्रस्ताव‎ शासनाकडे पाठवावा.‎ सिंदखेडराजाचे नाव बदलण्यात‎ येऊ नये, अन्यथा आंदोलन‎ करण्यात येईल, असा इशाराही‎ राजेश इंगळे, जाहीर पठाण,‎ अजमत खान, छावा संघटनेचे‎ संतोष राजे जाधव आदींनी या‎ निवेदनाद्वारे दिला आहे.‎

बातम्या आणखी आहेत...