आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सैलानीत पेटली पाच नारळांचीच होळी:उत्सव साजरा परंपरा खंडीत न होण्यासाठी प्रशासनाचा निर्णय; बंदी असतानाही भाविकांची मात्र गर्दी

बुलडाणा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यासह परराज्यात प्रसिद्ध असलेल्या सैलानी यात्रेत दरवर्षी होळीच्या दविशी हजारो नारळाची होळी पेटवण्यात येत होती. परंतु मागील दोन-तीन वर्षापासून कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने प्रशासनाने ही परंपरा खंडीत होवू नये,यासाठी मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत पाच नारळाची होळी पेटवून ही परंपरा सुरू ठेवली आहे. दरम्यान यात्रेला बंदी असताना देखील राज्यातील सैलानी भक्त मिळेल त्या मार्गाने सैलानी गाठत होते.

दर वर्षी सैलानी येथील हाजी हजरत अब्दुल रहेमान उर्फ सैलानी बाबा यांच्या यात्रेला होळीपासून सुरुवात करण्यात येते. या यात्रेसाठी मिळेल त्या वाहनाने लाखो भाविक सैलानीत डेरे दाखल होत असत. यातील काही भाविक हे महिनाभर या ठिकाणी झोपड्या करून राहात असत. दरवर्षी होळीच्या दविशी सैलानीत हजारो नारळाची होळी पेटवण्यात येत होती. यावेळी असंख्य भाविक लिंबू, बिबे, सुया व जविंत कोंबडे रुग्णाच्या अंगाखांद्यावरून ओवाळून ते या होळीत टाकत असत. असे केल्याने रुग्ण बरा होतो अशी भाविकांची धारणा होती. यासाठी दरवर्षी लाखो भाविक नारळाची होळी पेटवण्यासाठी सैलानीला येत होते. परंतु मागील दोन तीन वर्षापासून कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने यात्रेसह नारळाच्या होळीला बंदी घातली होती. यावेळी नारळाच्या होळीची परंपरा खंडीत होवू नये, यासाठी प्रशासनाच्या वतीने मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत पाच नारळांची होळी पेटवून ही परंपरा सुरू ठेवली.

पोलिस प्रशासनाचा चोख बंदोबस्त : सैलानी परिसरात भाविकांची गर्दी होवू नये, यासाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यामध्ये दोन पोलिस निरीक्षक, एक सहायक पोलिस निरीक्षक, सोळा पोलिस निरीक्षक तर १४६ पोलिस कर्मचारी व २४ महिला पोलिस कर्मचारी व २९ वाहतूक पोलिस कर्मचारी व गृहरक्षक दलाचे ५० जवान तैनात करण्यात आले आहेत.

एस. टी. महामंडळाला लाखोंचा फटका
होळीच्या दविशी सैलानी येथे नारळाची होळी पेटवण्यात येत असे. या दविशी लाखो भाविक सैलानीत डेरेदाखल होत असत. या भाविकांची ने-आण करण्यासाठी प्रत्येक आगारातून स्पेशल सैलानी बसेस सोडण्यात येत होत्या.

सैलानी मार्गावर प्रत्येक ठिकाणी बॅरिकेड्स
होळीच्या दविशी सैलानी येथे भाविकांची गर्दी होवू नये, यासाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने सैलानी जाणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर बॅरिकेड्स लावण्यात आले होते. तरी सुध्दा काही भाविक आड मार्गाने सैलानी गाठत होते.
सैलानी येथे मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत पेटवण्यात आलेली पाच नारळांची होळी.

बातम्या आणखी आहेत...