आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मान्यवरांचे‎ स्वागत:अपंग कल्याण, पुनर्वसन संस्थेमध्ये‎ दत्तक-बालक पालक मेळावा‎

बुलडाणा‎25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अपंग कल्याण व पुनर्वसन संस्थेद्वारे‎ संचालित अपंग, मूकबधिर व अंध‎ विद्यार्थ्यांचा शनिवार, दि.४ मार्च‎ रोजी दत्तक-बालक पालक मेळावा‎ व स्नेहसंमेलन उत्साहात पार‎ पडला. या प्रसंगी कार्यक्रमाचे‎ उद्घाटन आ.संजय गायकवाड,‎ जिल्हा समाज कल्याण अधिकारी‎ मनोज मेरत, ओमसिंग राजपूत व‎ संस्थेचे पदाधिकारी यांनी दीप‎ प्रज्वलन करुन लुईस ब्रेल हेलन‎ केलर यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण‎ केले. विद्यार्थ्यांनी मान्यवरांचे‎ स्वागत केले.‎

या प्रसंगी संस्थेचे संस्थेचे‎ अध्यक्ष डॉ.एस.एम.छाजेड यांनी‎ संस्थेची संपूर्ण महिती दिली. तर‎ कार्यक्रमाचे अध्यक्ष आ.संजय‎ गायकवाड यांनी संस्थेच्या कार्याचे‎ काैतुक करुन अपंग, मूकबधिर व‎ अंध मुलांसाठी सर्वतोपरी मदत‎‎‎‎‎‎‎‎‎‎ करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी‎ त्यांनी संस्थेतील पंचवीस दिव्यांग‎ विद्यार्थी दरवर्षी दत्तक घेण्याची‎ घोषणा केली. याप्रसंगी संस्थेतील‎ दिव्यांग विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक‎ कार्यक्रम सादर केली. तसेच दत्तक‎ घेतलेल्या पालकांचा दत्तक‎ बालकांनी पुष्प व भेटवस्तू देवून‎ सत्कार केला. कार्यक्रमास‎ जिल्हयातील संस्थेचे हितचिंतक,‎ दत्तक पालक, पत्रकार उपस्थित‎ होते.‎

सुगनचंद कोचर, मुंदडा,‎ डॉ.यादव, डॉ.गुप्ता, शाम राठी,‎‎‎‎‎‎‎‎‎‎ रमेशचंद कोठारी, अनिल नावंदर,‎ आयलाणी, जयसिंग जयवार,‎ पारसेठ बेदमुथा, बाबासाहेब‎ महाजन, सुरेखा जतकर, धर्मेश‎ कमाणी, एंडोले, गहरवार,‎ कुळकर्णी, कोठारी, लिखिते, तुषार‎ महाजन, डॉ.शैलेश छाजेड,‎ डॉ.उमाळे इ.पदाधिकारी उपस्थित‎ होते. कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक‎ शिक्षक व कर्मचारी यांनी परिश्रम‎ घेतले. सूत्रसंचालन ठाकरे व‎ सुजाता झिने यांनी केले. तर अंध‎ विद्यार्थी गजानन पवार योन ब्रेल‎ लिपीतून आभार प्रदर्शन याने केले.‎

बातम्या आणखी आहेत...