आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:पाचव्या  बहुजन साहित्य संमेलनाच्या अतिथीपदी अॅड. रोठे यांची निवड

बुलडाणा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे विचार आणि जीवन साहित्यावर आधारित देशातील पहिल्या भव्य नेताजी जागर साहित्य संमेलनाचे मुख्य आयोजक म्हणून ॲड.सतीशचंद्र रोठे यांना राज्यस्तरीय बहुजन साहित्य संमेलनाच्या मुख्य अतिथी म्हणून निवड करण्यात आली.

बहुजन साहित्य संघ चिखली द्वारा २० नोव्हेंबर ला नियोजित पाचव्या राज्यस्तरीय बहुजन साहित्य संमेलनाच्या बैठकीत आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड‌.सतीशचंद्र रोठे यांची निवड झाली. यावेळी पाचवे राज्यस्तरीय बहुजन ‌साहित्य संमेलन आयोजन समितीचे अध्यक्ष अॅड. विजयकुमार कस्तुरे, संघटक साहित्यिक बबनराव महामुने, साहित्यिक सचिव मनोहर पवार यांच्यासह आयोजन समितीच्या पदाधिकाऱ्यांचा सहभाग होता.

बातम्या आणखी आहेत...