आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:मोकाट फिरणारे गोऱ्हे नेमके कुणाचे... दोघांमध्ये वाद झाल्यानंतर पोलिसांचा चक्क डीएनए चाचणीचा निर्णय

बुलडाणा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
याच गोऱ्ह्याची होणार डीएनए चाचणी
  • एका टोळीने बैल पकडल्यानंतर मूळ मालकाचाही दावा, वाद पोलिसांत

दैनंदिन जीवनात रोजचे दावे-प्रतिदावे आणि व्यवहारांतील वाद अनेकदा पराकोटीला जातात. यातून पोलिस ठाणी गजबजतात आणि सुरू होतो साक्षी-पुराव्याचा खेळ. मात्र, हे झाले माणसांचे... इथे चक्क एका छोट्या बैलावरूनच (गोऱ्हे) वाद पेटला आणि प्रकरण हातघाईवर आले. शेवटी पोलिसही काही कमी नाहीत. त्यांनी मूळ जन्मदात्या गाईचा मालक शोधण्यासाठी चक्क या बैलाची डीएनए चाचणी करण्याचा निर्णय घेतला. आता दोन्ही दावेदार गटांना या चाचणीचा अहवाल येईपर्यंत वाट पाहावी लागेल. अशा प्रकरणात प्राण्याची डीएनए चाचणी करावी लागणारे राज्यातील कदाचित हे पहिलेच प्रकरण असावे. आता हा बैल आणि जन्मदात्या गाईच्या रक्ताचे नमुने घेतले जातील. औरंगाबादेत डीएनए चाचणी झाल्यानंतर १५ दिवसांनी अहवाल येईल.

शुक्रवारी ठाण्यात मोरे यांनी याबाबत तक्रार दाखल केली. दोन्ही गटांनी बैलावर हक्क सांगितल्याने पोलिसही संभ्रमात होते. अखेर पोलिसांनी त्या बैलाची डीएनए चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, मोरे यांनी हा गोऱ्हा आपला असल्याचा दावा करताना या वंशावळीतील जनावरे आपल्याकडे असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे डीएनए टेस्टमधील निष्कर्षच गुन्हेगार ठरवणार आहेत. सध्या हा गोऱ्हा येळगावच्या गोरक्षणात हलवण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार प्रदीप साळुंखे हे करत आहेत.

ट्रकमधून बैलाला नेताना झाला होता वाद

बुलडाणा शहरातील तानाजीनगर, मच्छी लेआऊट येथील पटांगणात दररोज गुरेढोरे दिवसभर चरतात. चरून थकल्यावर आराम करतात. त्या जनावरांमध्ये प्रदीप मोरे यांच्या मालकीची १० ते १२ जनावरे आहेत. दरम्यान, ९ सप्टेंबरच्या रात्री ११ च्या सुमारास येथील इंदिरानगरातील काही लोक एका ट्रकमधून बैलास जबरदस्तीने घेऊन जात असताना मोरे यांनी पाहिले. त्यांनी अडवले तेव्हा लोकांनी वाद घातला. त्यानंतर परिसरातील काही लोक आल्याने हा गोऱ्हा कुणाच्या मालकीचा ते पोलिस ठरवतील, असे ठरले.