आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घटमांडणी करून भाकीत:दोन वर्षांच्या खंडानंतर भेंडवळ येथे घट मांडणी, आज वर्तवणार राजकीय, सामाजिक भाकीत

बुलडाणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बुलडाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथे अक्षय तृतीयेला घटमांडणी करून भाकीत वर्तवले जाते. तीनशे वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा आजही चंद्रभान वाघ यांच्या वंशजांनी जपली आहे. मंगळवारी अक्षय तृतीयेला घट मांडणी करण्यात आली. आता बुधवारी, ४ मे रोजी भाकीत वर्तवले जाणार आहे. या ठिकाणी दरवर्षी राजकीय, सामाजिक व पिकांच्या बाबतीत भाकीत वर्तवले जाते. या भाकिताकडे सर्वांचे लक्ष लागून असते. कोरोनामुळे गेली दोन वर्षे ही घट मांडणी झाली नव्हती. यंदा दोन वर्षांनी घट मांडणी करण्यात आली आहे. पुंजाजी वाघ महाराज व घरातील इतर व्यक्ती ४ मे रोजी सकाळी ६ वाजता घटातील प्रत्येक धान्य, घट व घागरी वरील सांडोई, पापड यांचे निरीक्षण करणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...