आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक:जिल्ह्यात प्रभाग रचनेनंतर झाले आता प्रभागातील जागांचेही आरक्षण जाहीर ; कोणाचे गणित हुकवणार?

बुलडाणा17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील आठ नगर पालिकांच्या प्रभागांसाठी आज आरक्षण सोडत काढण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने पन्नास टक्के महिला आरक्षण काढण्यात आले. महिला अनुसूचित जाती, जमाती व सर्वसाधारण महिला आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. या आरक्षणावर हरकती घेण्यासाठी १५ ते २१ जून ही मुदत देण्यात आली आहे. आयुक्तांकडे घेतलेल्या या हरकती बाद झाल्या म्हणजेच निवडणुकीचे पडघम वाजण्यासाठीची तारीख केव्हाही जाहीर होऊ शकते. त्यापूर्वी मतदान यादी पुनर्रिक्षणाचा कार्यकम निवडणूक विभागाने दिला आहे. प्राप्त माहितीनुसार ३१ मे २०२२ रोजी पर्यंतची मतदार यादी ग्राह्य धरण्यात येणार आहे. मात्र आरक्षणानंतर कुणाचे राजकीय नियोजन हुकते अन् कोणाचे जमू शकते. हा चर्चेचा विषय असला तरी उमेदवार कोण राहतो. यावरच राजकीय गणित अवलंबून राहणार आहे. बुलडाणा नगर परिषदेमध्ये यावेळी दोन वॉर्डाची वाढ झाल्याने एक प्रभाग वाढला आहे. पंधरा प्रभाग रचना पडल्यानंतर अनेक भाग तोडून दुसरीकडे जोडण्यात आला आहे. प्रभाग रचनेत वाढ झाल्याने राजकीय दृष्टीने नवीन आवाका जुन्या नगरसेवकांच्या बाहेर निश्चितच गेला आहे. अनेक भागांत विकासाची कामे केली अन् नेमका तो भाग दुसरीकडे गेल्याने अनेकांचे अंदाज आता हुकण्याचे चिन्ह दिसत आहेत. पुरुषांना उभे राहायचे असे वॉर्ड महिला आरक्षित निघाले आहेत. १५ जागा महिलांसाठी राखीव असून तीन अनुसूचित जाती महिला, एक अनुसूचित जमाती महिला व अकरा सर्वसाधारण महिला राखीव जागा निघाल्या आहेत. पूर्वी नगर पालिकेच्या अध्यक्षासह २९ जागा होत्या तर तीन नामनिर्देशित सदस्य होते. आता ३० जागा झाल्या आहेत. या २९ मध्ये १० जागांवर शिवसेनेचे नगरसेवक निवडून आले होते. पाच भाजपचे नगरसेवक निवडून आले होते. आठ नगरसेवक काँग्रेसचे होते, तर तीन राष्ट्रवादी काँग्रेसचे होते. ३ भारिपचे होते. मात्र मध्यंतरी अनेक नगरसेवक शिवसेनेसोबत जोडले गेल्याने यंदाचे चित्र बदललेले दिसेल. इतर ठिकाणचे असे होते चित्र : खामगावमध्ये एकूण ३४ जागांमध्ये काँग्रेस ११, भाजप १९, राष्ट्रवादी १ भारिप १ व अपक्ष २ होते. मेहकरमध्ये जागा २५ मध्ये काँग्रेस १०, सेना १४, अपक्ष १ होते. जळगाव जामोदच्या १९ जागांमध्ये काँग्रेस ६, सेना २, भाजप १०, भारिप १ होते. नांदुराच्या २४ जागांमध्ये काँग्रेस २,भाजप ४, अपक्ष अर्थातच विकास आघाडीच्या १८ जागा होत्या. देऊळगाव राजाच्या १९ जागांमध्ये काँग्रेस ४, सेना ५, भाजप ५, राष्ट्रवादी ४ व अपक्ष एक जागा होती. शेगावच्या २७ जागांमध्ये काँग्रेस २, सेना ४, भाजप १५, राष्ट्रवादी २, एमआयएम २, भारिप २ जागा होत्या. मलकापूरच्या २९ जागांमध्ये काँग्रेस १७, एमआयएम ४ अपक्ष ८ जागा होत्या. जळगाव, शेगाव भाजपचा गड : जळगाव जामोद विधानसभेवर भाजपचे वर्चस्व राहिलेले आहे. परंतु संग्रामपूर नगर पंचायतीने भाजपला चांगलाच झटका दिला आहे. शेगाव व जळगाववर भाजपचे वर्चस्व राहिले आहे. यावेळी या दोन्ही नगर पालिका सांभाळण्यासाठी आमदार संजय कुटेंसाठी आव्हानच राहणार आहे.

असे आहे आरक्षण Âबुलडाणा- जागा ३०, तीन अनुसूचित जाती, १ अनुसूचित जमाती, उर्वरीत पैकी ११ सर्वसाधारण महिला Âखामगाव - ३४ जागा- चार अनुसूचित जाती, उर्वरीत पैकी १३ सर्वसाधारण महिला Âनांदुरा - २५ जागा- तीन अनुसूचित जाती, उर्वरीत पैकी सर्वसाधारण १५ महिला Âमेहकर - २६ जागा- पाच अनुसूचित जाती, उर्वरीत पैकी ८ सर्वसाधारण महिला Âमलकापूर - ३० जागा- दोन जागा अनुसूचित जातीसाठी, उर्वरित पैकी १३ सर्वसाधारण महिला

सत्ता बदल झाला सिंदखेड राजा मतदार संघामध्ये देऊळगाव राजा नगर पालिकेत भाजप सेनेची सत्ता होती. तेव्हा आमदार शिवसेनेचा होता आता राष्ट्रवादीचा आहे. त्यामुळे यावेळी बदल होण्याचे संकेत अधिक असणार आहेत. बुलडाणा विधानसभेत शिवसेनेला मोताळा नगर पंचायत मिळू शकली नाही. आता बुलडाणा सत्ता अप्रत्यक्षरित्या सेनाच हाकत आहे. त्यामुळे नवीन प्रभाग रचना तरी त्यांच्या जुन्या जागांभोवतीच फिरत आहे. तरीही काँग्रेस व भाजपा भोवतीही प्रभाग रचना पथ्यावर पडण्यासारख्या आहे. त्यामुळे यावेळी अनेकांना धक्का बसेल की नवीन उमेदवार राहतील हे सांगणे आजतरी कठीण आहे.

जे आहेत त्याला शिवसेना सामोरे जाणार ^प्रभाग रचना झाल्या, आरक्षणही निघाले आहेत. त्यात जे काही निघाले असेल ते शिवसेनेला कोठे कसे आहे. ते त्या स्थळी बघूनच कळेल. आम्ही तर जे आहे त्याला सामोरे जाण्यास तयार आहोत. -जालिंदर बुधवत, शिवसेना जिल्हाप्रमुख

प्रभागाबाबत हायकोर्टात दाद मागणार ^ज्या ठिकाणी आक्षेप घेतले होते. त्या प्रभाग रचनेच्या उल्लंघन झाले आहे. परिणामी जेथे हरकती व दावे फेटाळण्यात आले आहेत. त्या ठिकाणी पक्षाचे वतीने हायकोर्टात दावे दाखल करणार आहोत. -तुकाराम अंभोरे पाटील, जिल्हा समन्वयक, नगर पालिका, राष्ट्रवादी

पारंपारिक पद्धत डावलल्यास न्यायालयात ^आमच्या कार्यकर्त्यांच्या सूचना व त्यांचे काही म्हणणे ऐकून घेणार आहोत. त्यानंतर जर पारंपारीक पद्धतीने प्रभाग रचना व आरक्षण काढले असेल तर आम्ही न्यायालयात दाद मागू. -ॲड. आकाश फुंडकर, जिल्हाध्यक्ष भाजप

बातम्या आणखी आहेत...