आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रास्ता रोको:त्रास देणाऱ्या केंद्र शासना विरुद्ध; ईडी चौकशीच्या विरोधात शेगावात काँग्रेसचे रास्ता रोको

शेगाव11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेसचे राष्ट्रीय नेता व खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात ईडी चौकशी लावून त्यांना त्रास देणाऱ्या केंद्र शासना विरुद्ध १५ जून रोजी काँग्रेस पक्षाच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको करून जेल भरो आंदोलन करण्यात आले. केंद्रातील मोदी सरकार ईडीचा वापर करून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु असा कुठलाही प्रकार खपवून घेणार नाही. असा इशारा काँग्रेसचे राज्य सचिव रामविजय बुरुंगले व ज्ञानेश्वरदादा पाटील यांनी दिला आहे.

रास्ता रोको आंदोलनामुळे छत्रपती शिवाजी महाराज चौकात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेऊन त्यांना स्थानबद्ध केले. या आंदोलनात काँग्रेसचे प्रदेश सचिव रामविजय बुरुंगले, ज्ञानेश्वरदादा पाटील,शैलेंद्र पाटील, सरचिटणीस कैलास देशमुख, सचिव दीपक सलामपुऱीया, शहराध्यक्ष किरण देशमुख, महिला काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष मीराताई माळी, शहराध्यक्ष सविता झाडोकार, युवक काँग्रेसचे जिल्हा सचिव पवन पचेरवाल, लक्ष्मण गवई, भिकू सारवान, ओमप्रकाश शर्मा, सुनील टिबडेवाल, काका सोलंकर, विजय वानखडे, बुड्डू जमादार, नगरसेवक प्रफुल्ल ठाकरे पाटील, माजी नगरसेवक डी.के शेगोकार, गोपाल कलोरे, युवक काँग्रेस शहर अध्यक्ष जुबेर सहारा, संतोष माने, यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले होते. विना परवानगी रस्ता रोको आंदोलन करणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्ता विरुद्ध शहर पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...