आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:सेवा समाप्तीच्या निषेधार्थ आरोग्य सेविकांचे आंदोलन

बुलडाणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सतरा- अठरा वर्षांपासून राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ग्रामीण भागात आरोग्य सेवा देणाऱ्या आरोग्य सेविकांना सेवेतून कमी केले जात आहे. जिल्ह्यातील १९ आरोग्य सेविकांना सेवा समाप्तीचा आदेश मिळाला असून येत्या काही दिवसांत १३० सेविकांना सेवेतून कमी केले जाणार आहे. या कारवाईच्या निषेधार्थ आरोग्य सेविकांनी गुरुवारी जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन केले. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिले.

ज्या कर्मचाऱ्यांना शासनाने घरचा रस्ता दाखवला. त्या १९ आरोग्य सेविकांना तात्काळ सेवेत घेण्यात यावे. तसेच इतर राज्यात एनआरएचएमच्या कर्मचाऱ्यांना कायम करण्यात आले. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही निर्णय घेण्यात यावा, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागातील जनतेला तत्पर आरोग्य सुविधा मिळाव्या, यासाठी २००६ मध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सुरू करण्यात आले आहे.

या अभियानांतर्गत आरोग्य सेविकांची भरती करण्यात आली. आरोग्य सेविकांनी ग्रामीण भागात जाऊन काम केले आहे. कमी पगारावर त्यांनी सेवा दिली. माता, बाल आरोग्य, गाव पातळीवर महिलांचे बाळंतपण करून शासनाच्या योजनांना तळागाळात पोहोचवल्या. कोरोना काळातही रुग्ण तपासणी व उपचारासाठी याच आरोग्य सेविका पुढे होत्या. मात्र कंत्राटी असल्याकारणाने त्यांना सेवेतून कमी करण्याचा सपाटा शासनाने लावला आहे. या कारवाईच्या निषेधार्थ जिल्ह्यातील आरोग्य सेविकांनी जिल्हा परिषद समोर ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनात जिल्हाभरातील आरोग्य सेविका सहभागी झाल्या होत्या.

बातम्या आणखी आहेत...